ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

केकत पांगरी शाळेत जागतिक महिलादिन साजरा

केकत पांगरी शाळेत जागतिक महिलादिन साजरा

गेवराई प्रतिनिधी;- जिल्हा परिषद शाळा केकत पांगरी येथे दि. 8 शुक्रवार रोजी जागतिक महिला दिन उत्साहात संपन झाला असून विद्याथीॅ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून गटशिक्षण कार्यालय गेवराईच्या कर्तव्यदक्ष विस्तार अधिकारी श्रमिती शेख मॅडम यांनी स्थान भूषवले . गुरुकुल इंग्लीश स्कुल गेवराईच्या प्राचार्य श्रीमती कुटे मॅडम , अर्धमसला शाळेच्या शिक्षिका व नाटय शिक्षण प्रशिक्षक श्रीमती तेलंग मॅडम, विघ्नहर्ता हॉस्पीटल गेवराईच्या डॉक्टर श्रीमती नागरे मॅडम . गेवराई न्यायालयातील विधिज्ञ ॲड. श्रीमती आर्दड मॅडम , गेवराई पोलिस स्टेशन च्या पोलीस श्रीमती बहिरवाल मॅडम यांनी मुली आणि माता पालका समोर प्रेरक विचार मांडले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती शेख मॅडम यांनी मुली शिकल्या तर आज ज्या महिला विचार पीठावरून बोलताना तुम्ही ऐकले त्यांच्या सारखे शिक्षक प्राध्यापक डॉक्टर वकील पोलीस आदी क्षेत्रात तुम्ही जाऊन स्वावलंबी बनु शकता. त्यासाठी तुम्हाला परिश्रम जिद्द ठेवावी लागेल व पालकांची साथ पण मिळवावी लागेल असे विचार मांडले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय श्रीमती अंधारे मॅडम तर सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थीनी भाग्यश्री राऊत हिने केले . कार्यक्रमाचे आभार श्रीमती नथाडे मॅडम यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाला व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई लगड ,मुख्याध्यापक सय्यद सर, मेघारे सर, चौधरी सर, पवार सर, शिंदे सर व वळवी सर यांनी परिश्रम घेतले .

error: Content is protected !!