ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

खामगाव येथील शाळेत महिला दिनाचे औचित्य साधून कर्तुत्वान महिलांचा सन्मान

खामगाव येथील शाळेत महिला दिनाचे औचित्य साधून कर्तुत्वान महिलांचा सन्मान

गेवराई प्रतिनिधी;- महिला दिनाचे औचित्य साधून खामगाव शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शारदा अंकुशराव नागरगोजे यांनी ऊसतोड कामगार, घरकाम, शेती काम करणाऱ्या महिलांचा तसेच संघर्ष मातांचा, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व शाळेत सर्व कष्टकरी महिलांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
महिला दिनानिमित्त बारा महिने ऊन, वारा, पाऊस झेलत सतत कष्ट करणाऱ्या संघर्ष मातांचा कर्तृत्ववान महिलांचा पुष्पगुच्छ व झाडांची भेट देऊन सत्कार करण्यात आला. गीत गायन, संगीत खुर्ची, बकेटात चेंडू फेकणे, मुलाखत, उखाणे अशा स्पर्धांच्या माध्यमातून सर्व महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ग्रामीण भागातील महिलांना अशा विविध उपक्रमांचे आयोजन करत बोलकं करण्याचा प्रयत्न शाळेने केला. सर्व महिलांनी आपल्या वयाचं भान हरपून स्पर्धेत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी संघर्षमाता अनिता खराद यांचा सन्मान करण्यात आला. कर्तृत्ववान महिला वच्छलाबाई वाघ, कुसुम काकडे, पंचफुला रंधे, गोदावरी मिसाळ यांना सन्मानित करण्यात आले. विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांचा शाळेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला तर आजीबाईंनी आपल्या गीतगायनाने मंत्रमुग्ध केले. ग्रामपंचायत सदस्य प्रयागाबाई पोटभरे यांच्या खडतर प्रवासाची यशोगाथा मुलाखतीतून प्रकट झाली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी थोर महिलांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. शारदा नागरगोजे मॅडम यांनी बालविवाह, आरोग्य, स्वच्छता, मुलींचे शिक्षण, इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. बालविवाह प्रतिबंधक सामुदायिक प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी निलावती डिंगरे, कमल खराद, मंदा खराद, वच्छलाबाई वाघ, कुसुम काकडे, पंचफुला रंधे, गोदावरी मिसाळ, आशा साके, विद्या मचे, कविता मचे, वंदना खेडकर, प्रयागाबाई पोटभरे, कांता रंधे, भिवरा गवारे, भारती मचे, रोहिणी खराद, सुमित्रा डिंगरे, वृंदावनी वाघ, आशा वाघ, कांचन खराद, पल्लवी वारे, शारदा उधे, मनिषा झिणे, राणी गुंड,स्वाती आंधळे, अश्विनी खराद, मनिषा पोटभरे व सर्व गावकरी महिला उपस्थित होत्या. आमच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी खामगाव शाळेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल गावकरी महिलांनी शाळेचे आभार मानले.

चौकट

शारदा नागरगोजे मॅडम सतत नवनवीन उपक्रम राबवतात

खामगाव शाळेतील मुख्याध्यापिका सौ. नागरगोजे मॅडम ह्या आपल्या शाळेत सतत नवनवे उपक्रम राबवतात महापुरुषाच्या जयंती, स्वच्छता मोहीम, बेटी बचाव बेटी पढाव शिक्षणाचे महत्व हे पटवून देतात व गावातील महिला मंडळ पुरुष यांना सोबत घेऊन हे उपक्रम राबवतात तसेच विद्यार्थ्यांसाठीही अनेक उपक्रम राबवून खेळ खेळत शिक्षणाचे धडे देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मन ही शाळेत लागते शाळेचा पट या सर्व गोष्टीमुळे बऱ्यापैकी असून अशा विविध उपक्रम घेत असल्याने नागरगोजे मॅडम यांचे गावकऱ्यातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!