ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

पळसाचे झाड आधीच दर्शवितात होळीची चाहूल

पळसाचे झाड आधीच दर्शवितात होळीची चाहूल

शेवगांव;- सर्वत्र पळस फुललेला दिसत असल्याने होळीची चाहुल लागल्याचे सर्वत्र दीसत आहे. तसेच पळस फुलांचे होळीला महत्व असल्याचे जुणे जानकाराचे म्हणणे आहे.
होळी व धुलीवंदना दरम्यान पळस फुलाच्या उपयोग ग्रामीण भागात रंग तयार करण्यासाठी करतात. रस्त्याच्या बाजूला लक्षवेधी पळस फुलल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
नुकताच हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. पळसाची रक्त रेशमी रंगाची फुले लक्ष वेधून घेतात. सामान्य वापरात पळसाला पाने तीनच असी मनही प्रचलित आहे. तोच पळस बहुगुणी असून त्याच्या फुलांच्या उपयोग होळीमध्ये रंग बनविण्यासाठी होतो. पानाच्या उपयोग पत्रावळी बनवण्यासाठी होते. झाडाची पाने पूर्णपणे गळून पडल्यावर फेब्रुवारी च्या सुरवातीला या झाडाला फुलांचे बहार फुटते. पळस राना वनात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. त्याची पाने तळ हाताऐवढी रुंद व जाळ असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी पळसाच्या पानाचा वापर होतो.या फुलाच्या पूर्वी रंग करण्यास वापर होत असे.पण बदलत्या काळानुसार कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली.पळसाला सेंगा येतात त्यातील बिया कडु असतात यालाच पळसपापडी म्हणतात. कुठेही पळसाच्या झाडाची पाने तीन पानाच समूहातचं असतात.त्यामुळेच पळसाला पाने तीनच ही म्हण मराठीत रूढ झालेली आहे.
पळसाच्या झाडाचे फार महत्त्व आहे. त्याच्या वापर ज्याप्रमाणे औषधी वनस्पती म्हणून होतो. त्याचप्रमाणे या झाडाला आलेल्या फुलाच्या वापर हा काही वर्षापूर्वी होळीचे रंग बनविण्यासाठी केला जात असे, परंतु बाजारात विविध प्रकारच्या नैसर्गिक रंग विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने त्याचे महत्त्व कमी झाले आहे.परंतु आजही खेडेगावात या रंगाचाच वापर केला जातो.पळसाला हिंदु धर्मात धार्मिक महत्त्वही आहे.
हिंदू धर्मातील काही धार्मिक विधी मध्ये पळसाची पाने, लाकूड आणि फुलांचा वापर आजही केला जातो.
हिंदू धर्माच्या त्या त्या मान्यतेनुसार पळस फुलाची उत्पत्ती सोमरसात बुडलेल्या गरुडाच्या पडलेल्या पिसापासून झाली असल्याचे पळस वृक्षाबद्दल एक आख्यायिकेत आहे. यामध्ये देवी पार्वतीने ब्रह्मदेवांना पळस वृक्ष होण्याच्या श्राप दिला होता.या झाडाचे धार्मिक महत्त्व त्याच्या पानाच्या तीन निर्मितीपासून सुरू होते. पानांच्या मध्यभागी भगवान विष्णू डावा भाग ब्रह्मा आणि उजवा भाग महादेवचे प्रतिनिधित्व करतो.शास्त्रात पलाश वृक्षाला देवाच्या खजीना म्हटले जाते, कारण त्याच्या फुलाच्या मध्यभागी चंद्राचे सुंदर दृश्य दिसून येते.. तसेच इतिहासात ही पळसाच्या वृक्षांचे अनेक उदाहरणे आहेत…

error: Content is protected !!