ब्रेकिंग न्युज
स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळे

अखेर.. बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून शिम्पोरा ते खुंटेफळ थेट जलवाहिनी कामाचा कार्यारंभ आदेश निघाला..

अखेर.. बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून शिम्पोरा ते खुंटेफळ थेट जलवाहिनी कामाचा कार्यारंभ आदेश निघाला..
आष्टी प्रतिनिधी;- आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी व महत्त्वाकांक्षी असलेली योजना शिंपोरा ते खुंटेफळ योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आला आहे त्यामुळे खुंटेफळ साठवण तलावाच्या कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार असून यासाठी आपण वेळोवेळी सर्वांना बरोबर घेऊन राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असल्यामुळे आज त्याचे फलित म्हणून प्रत्यक्ष कार्यारंभआदेश निघाल्याबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांचे जाहीर आभार मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने मानत आहोत असे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
      उजनी प्रकल्पातील पाणी शिंपोरा येथून थेट जलवाहिनीद्वारे खुंटेफळ साठवण तलावात सोडण्याच्या कामाचे आज कार्यारंभ आदेश पारित झाल्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होऊन आष्टी तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे या कामासाठी आपण व मतदार संघातील सर्वच आजी-माजी आमदार यांनीही गेली अनेक वर्ष  प्रयत्न केले आहेत त्याचेच फलित आज प्राप्त झाले आहे
 याबाबत अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की,  उजनी तलावातील शिंपोरा ते खुंटेफळ ही थेट पाईपलाईन योजना कामासाठी आपण आपल्या कालावधीमध्ये प्रयत्न केले आहेत या अगोदर ही योजना दुसऱ्या पद्धतीने होती परंतु शिंपोरा ते खुंटेफळ साठी आपण वेळोवेळी आग्रह धरून ही योजना मंजूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत याचा आज मनस्वी आनंद होत आहे.
 खुंटेफळ साठवण तलाव  आष्टी उपसा सिंचन योजना क्र.३ ही बहुप्रतिक्षित असून त्यातील थेट जलवाहिनी  कामाचे कार्यारंभ आदेश निघाल्यामुळे 1108 कोटी रु. किमतीच्या योजनेमुळे आष्टी तालुक्यातील सतत दुष्काळाचे छायेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.. या योजनेमुळे मतदार संघातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हरितक्रांती घडण्यास मदत होणार आहे व कायमस्वरूपी शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे या सर्व कामास महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदा पवार जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब या सर्वांचे प्रयत्न असून त्यांचे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार मानतो त्यांनी या कामी फार मोठे योगदान दिले आहे लवकरच या कामाचा भव्य शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे  यांनी शेवटी सांगितले.
error: Content is protected !!