ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

साक्षाळपिंप्री येथील मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंद करू नयेत..!

साक्षाळपिंप्री येथील मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंद करू नयेत..!

पंकजाताई मुंडेचे पोलीस अधीक्षकांना पत्र ..!

बीड प्रतिनिधी ;-भारतीय जनता पार्टी, महायुतीचे अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर परवा त्यांचे बीड जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हा सीमेवर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. परवा श्री क्षेत्र नारायण गड येथे दर्शन घेऊन गेवराई कडे जात असताना साक्षाळपिंप्री येथील काही मराठा तरुणांनी काळे रुमाल दाखवून निदर्शन केले होते. मराठा समाजाचा आक्रोश सत्य असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशी भूमिका यापूर्वीच पंकजा मुंडे यांनी मांडलेली आहे.  साक्षाळपिंप्री येथील तरुण युवकांवर गुन्हे नोंद करू नये अशी भूमिका घेत पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे कळवले आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सरचिटणीस प्रा. देविदास नागरगोजे, चंद्रकांत फड यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. गोल्डे यांना पत्र दिले आहे.

 

या पत्रात म्हटले आहे. की, मला अशी महिती मिळाली आहे की, माझ्या दौऱ्यात बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथे दोन-तीन युवकांनी काळे रुमाल घेवून निदर्शनं केले. या युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी शांतपणे निदर्शने करण्याबाबत कोणतीही हरकत असण्याचे कारण नाही. माझी याबाबत कोणतीही तक्रार नाही. ही मुलं तरुण वयाची, बहुतेक शिक्षण घेणारी किंवा नोकरीसाठी प्रयत्न करणारी असावीत, गुन्हे दाखल केल्याने त्यांच्या पुढील प्रवासामध्ये त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. ते होऊ न देणे ही बीड जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून माझी जबाबदारी आहे आणि ते परिपक्वपणाचे ठरेल असे मला वाटते. कोणत्याही शासकीय मालमत्तेचे नुकसान होत नसेल किंवा व्यक्तीला हानी / ईजा होत नसेल, आचारसंहितेचा भंग होत नसेल, कायद्याचे उल्लंघन होत नसेल तर असे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत ही विनंती.

error: Content is protected !!