ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणास भाटेवाडीतून अटक

अंमळनेर ] प्रतिनिधी. २ पाटोदा तालुक्यातील  मौजे भाटेवाडी  येथील तरुण विशाल रावसाहेब गावडे व १९ वर्ष हा त्याच्या गावांमध्ये तलवारी घेऊन फिरत होता, तसेच तो त्याच्याकडील तलवार सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्राम वर दहशत निर्माण करणारे व्हिडिओ बनवून स्वतःचे id वर टाकत होता, लोकसभा निवडणूक २०२४ आचारसंहिता चालू असल्याने अमळनेर पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर असल्याने नमूद आरोपीस त्याच्या गावातून  दि. २७/०३/२०२४ रोजी रात्री ७.३० वाजता त्याच्याकडील तलवारीसह ताब्यात घेण्यात आले.  परिसरातील सर्व नागरिकांनी आचारसंहितेचे पालन करून आपल्यावर होणाऱ्या कारवाई टाळावी.

आचारसंहितेमध्ये  सोशल मीडियावर पडणारे वादग्रस्त पोस्ट  तसेच  दहशत निर्माण करणारे शस्त्र , यासारख्या नियमांचे उल्लंघन करणे  आचारसंहितेचा भंग करणे असा होतो .  त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे . सदरची कारवाई सपोनि सपकाळ , पोलीस कॉन्स्टेबल योगेश बहिरवाळ व पोलीस नाइक आघाव, पोलीस कॉन्स्टेबल श्याम खाडे ( गोपनीय )चालक खाडे यांनी केलेली आहे, व आरोपीस अटक केलेली आहे. आज रोजी कोर्ट पाटोदा यांना त्याची न्यायालयीन कोठडी मागविली आहे,पुढील तपास psi पटेल, पोकॉ प्रभाकर खोले,पोकॉ योगेश बहिरवाळ करीत आहेत.

error: Content is protected !!