ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

मोबाईल – वरदान की श्राप?

मोबाईल – वरदान की श्राप?
हल्ली रस्त्यावरून प्रवास करताना एक बाब सातत्याने खटकते ती म्हणजे गाडी चालवताना नाहक मोबाईलचा होत असलेला वापर.आपण पाहतो छोट्यांपासून मोठ्यापर्यंत अनेकजण सर्रासपणे आलेले संदेश वाचत गाडी चालवणे,आलेला कॉल उचलून बोलत गाडी चालवणे,थोड्या थोड्या वेळाने उगीच मोबाईल काढून पाहणे हे नेहमीचे झाले आहे.सरकार कडून ठिकठिकाणी रस्त्यावर सुरक्षिततेबाबत पाट्या लावलेल्या असतात परंतु याकडे दुर्लक्ष करून अनेकजण गैरजबाबदारीने वाहन चालवताना दिसतात.सध्याच्या परिस्थितीत अपघातात होत असलेली प्रचंड वाढ यात मोबाईल हे सुद्धा मुख्य कारण असणे नाकारता येत नाही.
            जीवन हे अनमोल आहे मग त्याचे महत्त्व आपणाला कळतं नाहीये का असा प्रश्न काही दृश्ये पाहताना पडतो.किती महत्वाचा कॉल अथवा मेसेज असला तरी तो जिवापेक्षा जास्त किमती आहे का? जर एखाद्या व्यक्तीचा आलेला फोन आपण टाळला आणि कुठेतरी सुरक्षित ठिकाणी थांबून मग त्याच्याशी बोललो तर जो पाच दहा मिनिट उशीर झालेला असेल त्यात खूप मोठे नुकसान होते असे नाही एव्हाना जास्त तर येणारे कॉल्स हे किरकोळ गोष्टीसाठी असतात.तरुण मुलांच्या बाबतीत तर केवळ मित्रांच्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक पोस्ट वाचण्यासाठी गाडी चालवत वेळ देत असतात.
           मी एके ठिकाणी पाहिलेला किरकोळ अपघात ज्यात कानाला मोबाईल लाऊन आणि तिरकी मान करून फोनवर बोलत मोटरसायकल चालवणारा तरुण छोट्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येत असताना अचानक समोरून आलेले वाहन पाहून मोटरसायकल नियंत्रित न झाल्याने वळण्याऐवजी सरळ समोर जाऊन मोठ्या नाल्यात मोटरसायकल सहित पडला बरं एवढ्यावर तो थांबला असता तर ठीक परंतु त्यानंतर सुद्धा मोटरसायकल तशीच सोडून तो उठला आणि कपडे झटकत परत फोनवर बोलत उभा राहिला.सुदैवाने जास्त दुखापत झाली नव्हती परंतु विचार करण्यास भाग पाडणारे ते एकंदरीत दृश्य होते.
           जीवाची पर्वा न करता असले कृत्य नेमके कशासाठी करतो हा विचार करायला हवा.मोबाईल हा आजच्या आधुनिक युगासाठी खूप महत्वाचा दुवा बनला आहे.जसे त्याचे फायदे तसेच त्याचे नुकसानही आहे.मोबाईलमुळे जीवन जगणे जरी सोपे झाले असले तरी फायद्यापेक्षा जास्त त्याचे नुकसान पाहायला मिळते.नवीन नवीन अपडेट्स असलेले मोबाईल घेऊन तासनतास त्यावर वेळ घालवणारे अनेकजण पाहायला मिळतात.मोबाईलचा सदुपयोग म्हणजे  त्याद्वारे जीवनात सहजता यावी आणि अत्यंत तातडीच्या वेळी मोबाईलमुळे मदत घेता यावी परंतु असे घडताना दिसत नाही.ऑनलाईन गेम आणि सोशियल ॲप वरून मैत्री होते आणि त्या फसव्या मैत्रीतून पुढे निराशा वाढून जीवन संपवलेले काही उदाहरण आहेत तर मोबाईलचा गैरवापर करून फसवणुक झाल्याचे पण बरेचसे उदाहरण आपण पाहिलेले किंवा एकेलेले असतील.इमेल आणि मेसेज बॉक्स मध्ये आलेल्या अनेक प्रकारच्या वेबलिंकसवर क्लिक करताच त्याद्वारे मोबाईल हॅक केला जातो आणि मग आपल्या नकळत आपल्या बँक खात्यामधून पैसे जातात आणि आपली फसवणूक होते.आपल्या दैनंदिन जीवनात सकाळच्या चहा पासून तर रात्री झोपण्यापूर्वी पर्यंत प्रत्येक गोष्टीचे अपडेट्स शेअर करण्याची काही जणांना सवय असते आणि हे शेअर करताना आपण हे विसरून जातो की याचा गैरवापर करून जाळ्यात अडकवणारे अनेक हॅकर्स किंवा तऱ्हाईत गुन्हेगार अश्या पोस्टची वाट पाहून असतात.
         कोणतेही ॲप इंस्टॉल करताना फोन गॅलरी,कॉल लॉग,मीडिया कंटेंट ,मेसेज बॉक्स ,कॅमेरा या सर्वांचा ॲक्सेस घेण्यासाठी अलाऊ आणि डेनाई असे ऑप्शन्स विचारले जातात आणि आपण स्वतः आपल्या संपूर्ण फोनचा ॲक्सेस त्या ॲपला देऊन टाकतो.आपण कधी विचार केला का आपण जे काही गूगलवर शोधत असतो त्या वस्तूंच्या बाबतीत फोनवर जाहिरात,कॉल्स आणि मेसेज येत राहतात.आपण दिलेल्या ॲक्सेसमुळे गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सोशल साईट अथवा ॲप मधील फोटोवरचे चेहरे वापरून अश्लील फोटो आणि व्हिडिओज बनवले जातात व ते व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली जाते.सिम कार्ड ब्लॉक झाले, विज बिल बाकी आहे,ATM ब्लॉक झाले आहे,बँक खाते बंद झाले आहे , कुरिअर आले आहे असे अनेक कारणे देऊन OTP मागितले जाते आणि अनेकजण सहजरित्या सर्व विचारलेली माहिती देऊन मोकळे होतात आणि जेंव्हा खात्यातून पैसे वजा होतात तेंव्हा पश्चाताप करत बसतात.
          महिलांनी प्रामुख्याने सोशल साईट वापरताना काळजी घ्यावी ,अनोळखी व्यक्ती किंवा समूह यांच्याकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट टाळावी किंवा त्या व्यक्ती अथवा समूहाची योग्य शहानिशा करून मगच स्वीकारावी म्हणजे नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा अगोदर काळजी घेतलेली बरी.एकंदरीत फसवणूकीचे अनेक प्रकार घडत असताना आरोग्यासाठी सुद्धा मोबाईल हानिकारक ठरत आहे. मोबाईलचा अतिवापर केल्याने लहान मुलांमध्ये नजरदोष आणि मेंदुविकार असले आजार होताना पहावयास मिळतात.महिलावर्ग कामात अडथळा करू नये म्हणून लहान मुलांना मोबाईल वर व्हिडिओ लावून देतात आणि तासनतास काम करत राहतात.अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल घेऊन त्यावर नको ते पाहताना पण अनेक पालकांनी मुलांना पकडले असेल.पालकांनी मुलांना मोबाईल दिल्यानंतर दुर्लक्ष करण्याऐवजी तिसरा डोळा कायम राखून ठेवला तरच काही प्रमाणात गैरवापर होण्यापासून थांबवता येईल.
            उपरोक्त उल्लेख केलेल्या बाबी प्रामुख्याने नेहमीच पाहायला मिळतात आणि काही बाबी यापेक्षा अधिक जास्त त्रासदायक असतात.मोबाईलचा वापर कसा आणि किती करायचा हा वयक्तिक प्रश्न आहे यावर मर्यादा लावणे हा सुद्धा आपल्या परीने ठरवण्याचा भाग आहे. मोबाईलवर PDF स्वरूपात पुस्तके उपलब्ध असतात,अनेक प्रकारची महत्वाची माहिती गोळा करता येते,साहित्य वाचन करता येते,मुलांसाठी अनेक प्रकारचे कार्टून स्वरूपात छान छान गोष्टी, बोधकथा पण सहज उपलब्ध होतात आणि याद्वारे मुलांना योग्य संस्कार देण्याचे काम पण करता येते.मोबाईल हा सदुपयोगी येणारा घटक म्हणून पाहण्याची गरज आहे.आपल्याला आलेला संदेश,व्हिडिओ,कुणाचे वक्तव्य ,एखाद्या घटनेचा वृतांत हे सर्व आपल्या ठिकाणी एकवेळ पडताळून मगच पुढे पाठवण्याची सवय लागली तर समाजात निर्माण होणारी तेढ कमी करणे सहज शक्य होईल.
error: Content is protected !!