ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

बीड लोकसभेचा राष्ट्रवादी पवार गटाचा उमेदवार हा राहणार

बीड प्रतिनिधी. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गटाची लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली असून आज दुसरी यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे . जयंत पाटील हे आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन दुसरी यादी जाहीर करणार आहेत . बीड जिल्ह्यातील जनतेचे आज या लोकसभेतील जाहीर करणारे उमेदवाराकडे पूर्ण लक्ष राहणार आहे . कारण पंकजा मुंडे यांची भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी जाहीर झाली असून . त्यांच्या विरोधात शरदचंद्रजी पवार साहेब कोणाला मैदानात उतरवतात याकडे पूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष आहे . राष्ट्रवादी पवार गटाकडून बीड जिल्ह्यातून ज्योतीताई मेटे व बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा आहे . पण पवार साहेब पंकजा मुंडे च्या विरोधात तगडा उमेदवार देणार आहेत . सध्या ज्योतीताई मेटे यांचे नाव आघाडीवर असून दुसरे नाव म्हणजे बजरंग सोनवणे तरीसुद्धा पवार साहेब कोणता पत्ता फिरवतात या याविषयी बीड जिल्ह्यात महिला उमेदवाराच्या विरोधात महिला उमेदवारच पवार साहेब देणार अशी चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे .
या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील अडचणीचा विषय ठरू शकतो . बीड जिल्ह्यातील एकूण मतदानापैकी मराठा समाजाचे मतदान हे सर्वात जास्त असल्यामुळे मराठा समाज राज्यासह बीड जिल्ह्यात कोणती भूमिका घेतोय याकडे सुद्धा महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे . यात एक मात्र निश्चित आहे जो मराठा समाजाचे मतदान घेऊ शकतो तो आजच निवडून आला असं समजलं तरी हरकत नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राजकीय पक्षाची उमेदवार मराठा समाजाचे मतदान कसे घेता येईल याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत . पण अजूनही मराठा समाज कोणत्याच बाजूने नाही . किंवा कोणत्याही एका पक्षाची बाजू घेतलेली नाही . त्यामुळे उमेदवारांची धाकधूक जास्तच वाढलेले आहे . याच मुद्द्याचा फायदा घेऊन पवार साहेब मराठा समाजाचे कार्ड वापरून बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा उमेदवार देतील अशी शक्यता आहे .

error: Content is protected !!