ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

अंमळनेर येथील तरुणांची व्यवसायाकडे वाटचाल

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अंमळनेर येथे  माऊली पान शॉपी , शिवपार्वती हॉस्पिटल शुभारंभ  संपन्न , मोरया ऑटोमोबाईल अँड सर्विस सेंटर  शुभारंभ संपन्न.

बीड [ अंमळनेर ] प्रतिनिधी. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील महाराष्ट्रातील नवीन मराठी सालाच्या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सणापासून मराठी  नववर्षाला सुरुवात होते . या नवीन वर्षाच्या  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर  वेगवेगळ्या क्षेत्रातील नवीन व्यवसायांची उद्घाटन गुढीपाडव्याचे मुहूर्त  साधून भव्यसमारंभ केले जातात . अशातच अंमळनेर येथील नवतरुणांची वाटचाल व्यवसायाकड चाललेली दिसत आहे . गुढीपाडव्याच्या मुहूर्त साधून माऊली पान शॉप या भव्य झालं ना आता शुभारंभ संपन्न झाला. तसेच शिवपार्वती हॉस्पिटल,  आणि मोरया ऑटोमोबाईल्स आणि सर्विस सेंटर वॉशिंग सेंटर या दालनांचा भव्य शुभारंभ पार पडला . सध्या तरी बेरोजगार तरुणांचा कल व्यवसायाकडे व आल्यासारखा दिसत आहे .

माऊली पान शॉपी उद्घाटन 

माऊली पान शॉपी  या दालनाचा भव्य शुभारंभ धामणगाव येथील प्रसिद्ध व्यापारी , चंदू पान शॉपी चे मालक , श्री चंद्रकांत चौधरी शेठ  यांच्या हस्ते शुभारंभ पार पडला . या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते , अंमळनेर गावचे सरपंच गोविंद शेठ गाडे , माजी सरपंच बाळासाहेब पोकळे , अंमळनेर गावचे माजी सरपंच अर्जुन आबा पवार , उद्योजक माऊली शेठ पवार , ग्रामपंचायत सदस्य महावीर काका पवार , कैलास बापू पवार , ग्रामपंचायत सदस्य पेनुशेठ पोकळे , माजी ग्रामपंचायत सदस्य संजय भास्कर पोकळे , अमोल पोकळे , संतोष आप्पा पोकळे , मनोज पोकळे सर , युवा नेते रमेश पोकळे , संभाजी पोकळे , प्रशांत पवार, मुन्ना शेठ ,आशिष ढगे , बिल्डर दिपक पोकळे शेठ ,आदित्य पवार, सिमला टेलर ,  नामदेव तांबारे , सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी चहा व नाश्त्याचा अल्पहार झाल्यानंतर  माऊली पान शॉपी चे मालक कल्याण पोपट पोकळे, अविष्कार पोपट पोकळे, भानु प्रताप पोपट पोकळे , माऊली पोपट पोकळे , यांनी सर्वांच्या आभार मानले  ,

शिवपार्वती हॉस्पिटल 

या भव्य हॉस्पिटल शुभारंभ प्रसंगी गुरुवर्य महंत श्री श्री १००८ स्वामी महादेवानंद भारती महाराज  यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनासाठी विशेष उपस्थिती  डॉक्टर अक्षय दीप संभाजीराव झावरे , डॉक्टर सुजय सुतारे सर , तसेच डॉक्टर हर्षल सुतारे मॅडम  यांची विशेष उपस्थिती होती  , तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक  श्री भागवत दत्तात्रय तोटे यांची उपस्थित होती . याप्रसंगी महाराजांनी बोलताना सांगितले जनसेवा हीच ईश्वर सेवा  हा मंत्र  घेऊन पुढे चालायचं आहे  रुग्णांची सेवा करायची आहे . तसेच सागर मच्छिंद्र धनवडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या  याप्रसंगी  अंमळनेर व पिंपळवंडी परिसरातील  सर्व सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ  उपस्थित होते . चहा व नाश्त्याचा अल्पहार नंतर  धनवडे परिवाराने येणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले .

 

error: Content is protected !!