ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

दौलतवाडी येथील शेतकरी महिला मिनाबाई सुखदेव पवार यांना सर्पदंश झाल्यामुळे जामखेड येथे उपचारासाठी हलवले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .

अंमळनेर दि.११(प्रतिनिधी)
पाटोदा तालुक्यातील दौलतवाडी येथील शेतकरी महिला मिनाबाई सुखदेव पवार( वय ४०) यांना विषारी सापाने दंश केल्याने उपचारादरम्यान जामखेड येथील एका हाँस्पीटलमध्ये मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक ८ एप्रील रोजी दुपारी ३.३० वाजता घडली.
याविषयी अधिक माहिती अशी की, अंमळनेर नजीक दौलतवाडी येथील मिनाबाई सुखदेव पवार या नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजता उठुन स्नान करण्यासाठी गेल्या असता आंघोळ करीत असतानाच पाठिमागुन विषारी सापाने पाठीमध्ये दंश केला. काही काळानंतर त्यांच्या लक्षात येताच त्यांना त्रास जाणवु लागला ,तात्काळ एका वाहनाने जामखेड येथे नेहण्यासाठी जात असताना वाटेतच त्यांना जास्त त्रास जाणवायला लागला . हाँस्पीटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले परंतु एका दिवसानंतर त्यांनी उपचाराला साथ देणे बंद केल्याने डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुनही उपयोग झाला नाही, अखेर त्यांचा मृत्यू झाला. मिनाबाई पवार या दौलतवाडी आणि परिसरात एक उत्तम महिला म्हणून त्यांची ओळख होती. घरी आलेल्या प्रत्येकाला भरभरून बोलने आणि चहा पाजल्याशिवाय परत न पाठविणे हा त्यांचा गुण होता. त्यामुळे प्रत्येकांनी त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली.”जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला” या पंक्तीप्रमाणे लोकांना आवडणार्या व्यक्तीलाच देवाने आपले केले असे म्हणण्याची वेळ आली. सायंकाळी सात वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार. करण्यात आले . याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,चेअरमन, व्यापारी, पत्रकार,शेतकरी, आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पाश्चात्य पती सुखदेव पवार आणि दोन मुले असा परिवार आहे.

error: Content is protected !!