ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

अंमळनेरचे व्यापारी अरुणनाना पोकळे यांचे निधन

अंमळनेर दि. १४ ( प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील अंमळनेरचे प्रतिष्ठित व्यापारी तथा जय बीअरबारचे मालक अरुणनाना किसन पोकळे (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने अ.नगर येथील साईदिप हाँस्पीटलमध्ये शुक्रवारी सकाळी  ९ वाजता निधन झाले .

अरुणनाना पोकळे हे अंमळनेरच्या प्रत्येक व्यक्तीचे नाना होते. रस्त्याने जाताना अनेकांना हसमुखाने बोलल्याशिवाय जात नव्हते ,अध्यात्मिक असल्याने अंमळनेरच्या सप्ताहात त्यांचा सहभाग असायचा ,सप्ताहात त्यांनी  अनेकदा अन्नदान केले.काही वर्षापासून ते मधुमेह आजाराने ग्रस्त होते. त्यातच त्यांच्या पायाला जखम झाल्याने त्यावरील छोटीशी शस्रक्रिया करण्यासाठी अ.नगर येथील साईदिप हाँस्पीटलमध्ये आठ दिवसापूर्वीपासुन उपचार घेत होते. परंतु अचानकपणे दिनांक १२ एप्रील रोजी अखेर ६६ वर्षाची दिनचर्या सकाळी ९ वाजता थांबली. सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात त्यांच्या. शेतामध्ये  अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी अंमळनेरचे व्यापारी, सरपंच, उपसरपंच ,सदस्य, पत्रकार, शेतकरी ,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, सुरेश,मंगेश,युवराज, असे तिन मुले सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!