ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

युवा शक्ती प्रतिष्ठान व मातोश्री लाल आखाडा यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

युवा शक्ती प्रतिष्ठान व मातोश्री लाल आखाडा यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला – प्राध्यापक मधुकर राळेभात

जामखेड प्रतिनिधी;-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला असून दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाजसुधारणेसाठीही अनेक कामे केली. त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. पण, ते अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत, ज्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते.असे यावेळी जयंती प्रसंगी प्राध्यापक मधुकर राळेभात बोलत होते.

आज रोजी जामखेड शहरातील युवा शक्ती प्रतिष्ठान व मातोश्री लाल आखाडा यांच्या वतीने श्री नागेश विद्यालयाच्या पाठीमागे मोहन वस्ताद पवार यांनी आपल्या निवासस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती निमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक मधुकर राळेभात तर प्रमुख पाहुणे प्रकाश सदाफुले, प्राचार्य विकी घायतडक, नगरसेवक दिगंबर चव्हाण, अमित जाधव, लहू पवार,विक्रांत घायतडक, नामदेव गंगावणे, प्रताप पवार,प्रा.राहुल आहिरे, विनोद सोनवणे,सुर्यकांत कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अर्थराज गायकवाड,सुरज पवार, मंगेश घोडेस्वार, योगेश औचरे, अल्ताफ शेख,सनी गायकवाड, विजय जाधव, गणेश दणाने आदींनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!