ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

धोत्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

धोत्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

सजवलेल्या बैलगाडीतून चिमुकल्यांची वाजत गाजत स्वागत

जामखेड – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,धोत्री केंद्र साकत येथे नव्याने दाखल होणाऱ्या चिमुकल्यांची सजवलेल्या बैलगाडीतून वाजत – गाजत गावातून मिरवणूक काढून शाळेत दाखल करुन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आली. एका छोट्या वाडीत एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतल्यामुळे पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते फित कापून मेळाव्याला कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.नव्याने दाखल होणाऱ्या मुलांना गुलाब पुष्प, शैक्षणिक साहित्य व गोड खाऊ स्वागत करण्यात आले.यावेळी स्वागतासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला खरपूडे यांनी सुंदर रांगोळी काढली होती.मुलांना विविध रोगांच्या कागदी टोप्या, रंगीबेरंगी कपडे,घातले होते.हातात झेंडे घेऊन वाजत – गाजत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या मुली/ मुले विद्यार्थ्यांनी सुंदर लेझिम नृत्य सादर केले.विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले आणि लक्ष्मीरुपी कुंकवाचा ठसा शाळेतील विद्यार्थ्यांचे पाहिले पाऊल घेण्यात आले.व त्यांचा उत्साह वाढावा म्हणून त्यांना फुगे भेट देण्यात आले.मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या विविध कृती पूर्ण करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले. त्यात शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भाषिक विकास विकसित व्हावे या उद्देशाने स्टॉल लावण्यात आले. सुंदर सेल्फी पॉईंटवर फोटो घेऊन सेल्फीचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मुख्याध्यापिका चंद्रकला खरपूडे व उपाध्यपक अभिमान घोडेस्वार यांनी हा सुंदर कार्यक्रम घेतल्याबद्दल व शाळेची गुणवत्ता अतिशय चांगली असल्याबद्दल कौतुक केले. तसेच कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी विद्यार्थी,पालक यांना जेवण देण्यात आले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे,शिक्षक नेते किसन वराट, केंद्रप्रमुख नवनाथ बडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम अडाले ,उपाध्यक्ष भाऊसाहेब अडाले ,अविनाश कदम ,
दादासाहेब कदम, तात्याराम कदम,काकासाहेब अडाले,जगन्नाथ(आप्पा) मुळीक, अमोल खैरे,गणेश अडाले,रमेश काळभोर,नानासाहेब कार्ले, सतिष कदम,शहाजी अडाले,राजेंद्र सुपेकर,पप्पू भोसले,सुभाष मेंगडे आदी शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य व धोत्री ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!