ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!

सारोळा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त रेकॉर्ड ब्रेक ग्रामस्थांचे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस..!

जामखेड (प्रतिनिधी)-आदर्श,उपक्रमशील डिजिटल, आयएसओ मानांकित, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार विजेती तथा पाच लाख रुपये बक्षिसाची मानकरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा द्वारा आयोजित “वार्षिक स्नेहसंमेलन सन 2023-24” शुक्रवार ,दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी सारोळा शाळेच्या प्रांगणामध्ये हजारो ग्रामस्थांच्या उच्चांकी उपस्थिती मध्ये उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाले.
‌‌ सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सन्मानीय श्री.बाळासाहेब धनवे साहेब यांच्या हस्ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला.शाळेचा सर्वांगसुंदर विकास व गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान गटशिक्षणाधिकरी,सर्व केंद्रप्रमुख यांच्या उपस्थित सारोळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
‌ देशभक्तीपर गीते शेतकरी गीत, कोळी गीत, खंडोबा गीत,छत्रपती शिवाजी महाराज गीत,जय श्रीराम,श्रीकृष्ण,मराठी व हिंदी रिमिक्स फ्युजन सॉंग या प्रकारच्या विविध गीतावर विद्यार्थ्यांनी अफलातून व अप्रतिम नृत्याचे सादरीकरण केले.सोशल मिडियाचा अतिरेक वापर,त्याचे दुष्पपरिणाम व वृद्धाश्रम या विषयावर आधारित सामाजिक संदेश देणारे नाटक विद्यार्थ्यांनी सादर केली.
‌ यावेळी जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब,केंद्रप्रमुख श्री.सुरेश मोहिते,श्री.विक्रम बडे,श्री.नवनाथ बडे,श्री.केशव गायकवाड,श्री.राम निकम साहेब,प्राथमिक शिक्षक बँक संचालक श्री. संतोष राऊत, श्री.विश्वस्त मुकुंद सातपुते,श्री.एकनाथ चव्हाण,श्री.गणेश नेटके,श्री.केशवराज कोल्हे,श्री.किसन वराट,श्री.नाना मोरे,श्री.नवनाथ बहिर,राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. लक्ष्मीकांत ईडलवार सर तसेच जामखेड तालुक्यातील विविध उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते.
‌ अतिशय सुंदररित्या आयोजन केलेल्या सदर कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवत तब्बल एक लाख वीस हजार (1,20,000/-) रुपयांचे आज पर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक बक्षीस रोख स्वरूपात जमा केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.माजीद शेख सर,आभार प्रदर्शन पदवीधर शिक्षक श्री.राहुल लिमकर सर यांनी केले.शाळेच्या विविध उपक्रम विषयक माहिती श्री. खंडेराव सोळंके सर,श्री.प्रशांत होळकर सर यांनी दिली.तसेच संपूर्ण गाण्याच्या संदर्भातील विद्यार्थ्यांची ड्रेपरी व वेशभूषा याची तयारी सौ.अमृता रसाळ मॅडम व सौ.शबाना शेख मॅडम यांनी करून घेतली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मनोज कांबळे,श्री.विजय जेधे,श्री.किरण माने,मुकुंद सातपुते,श्री.एकनाथ चव्हाण सर यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समिती,सर्व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!