ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

बाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवे

बाळासाहेब कोल्हे यांचे गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम प्रेरणादायी – गटशिक्षणाधिकारी – बाळासाहेब धनवे

प्राध्यापक बाळासाहेब कोल्हे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात साजरा

जामखेड प्रतिनिधी;-३३ वर्षाच्या सेवेत बाळासाहेब कोल्हे यांनी शिक्षकी पेशावर निष्ठा ठेवून प्रमाणिकपणे ज्ञानदानाचे काम केले त्यामुळे हजारे गुणवंत विद्यार्थी तयार झालेले . त्यांचे अनेक विद्यार्थी नोकरीत व व्यवसायत आहेत व आजही त्यांना कोल्हे सरां विषयी आदर आहे . हीच त्यांच्या आष्यातील मोठी कमाई असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले . सेवानिवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते .

जामखेड येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना.होशिंग विद्यालय व उच्च माध्यमिक कला वाणिज्य आणि विज्ञान ज्यूनिअर काॅलेजचे प्राध्यापक बाळासाहेब कोल्हे हे ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत. यानिमित्ताने आज रोजी सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. १९९१ मध्ये महाविद्यालयात भूगोल ह्या विषयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले, ते भूगोल विषयात पारंगत होते. जामखेड सारख्या ग्रामीण भागातुन त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचे विद्यार्थी आज विविध उच्चपदावर कार्यरत आहेत.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख अध्यक्ष स्थानी बोलताना म्हणाले की,प्राध्यापक बाळासाहेब कोल्हे यांनी आमच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहेत. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख तर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, आदर्श शिक्षक सुनिल दूधाडे हे होते.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, खजिनदार राजेश मोरे, संचालिका संगिता देशमुख, जामखेड तालुका शिक्षक समन्वय समिती चे अध्यक्ष मुकूंदराज सातपुते, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पारखे,पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड, प्राध्यापक डॉ. सुनिल नरके,त्रिंबक कुमटकर, डॉ.कैलास हजारे, प्राध्यापक विनोद बहिर आदी शिक्षक, शिक्षिका व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सौ.अबोली सागर नवले, सुर्यकांत ढवळे, सुनिल वाघमारे, डॉ कैलास हजारे, बळीराम जायभाय, प्राध्यापक आर.टी.चौधरी ,कोहक आर.बी. त्रिंबक कुमटकर यांनी मनोगते व्यक्त केली.
प्राध्यापक बाळासाहेब कोल्हे सरांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, सर्व संस्थेतील कर्मचाऱ्यांनी मला मोठ्या मनाने स्वीकारले व योग्य प्रसंगी माझ्या कार्याची प्रशंसा केली त्याबद्दल मला कार्य प्रणव राहण्यासाठी ऊर्जा मिळाली. विद्यार्थी घडवण्याचे पवित्र कार्य करण्याचे समाधान मिळाले.सूत्रसंचालन अनिल देडे व पोकळे मॅडम यांनी केले तर आभार शेख एस.ए. यांनी मानले.

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचे गौरवोद्गार

जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर काम केले आहे.बऱ्याच हायस्कूल मध्ये भेटी दिल्या आहेत.पंरतू दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना.होशिंग विद्यालय येथे शिस्त आहे.या विद्यालयात विविध उपक्रम, प्राचार्य श्रीकांत होशिंग व
शिस्तप्रिय स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेवून एक परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.या विद्यालयातील नियोजन पध्दतीने मी प्रभावित झालो.

बाळासाहेब धनवे (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, जामखेड)

error: Content is protected !!