ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आलं

श्रीनगर : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज 2 वर्षे पूर्ण झाली आहे. अशावेळी आज जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आलं आहे. जम्मू बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयितालाही अटक केली आहे. या प्रकरणाची अधिक माहिती संध्याकाळी 4.30 वाजता जम्मू झोनचे आयजीपी मुकेश सिंह पत्रकार परिषदेत देणार आहेत.

दरम्यान, शनिवारी अनंतनाग पोलिसांनी सांबा परिसरातून दर रजिस्टंट फ्रन्ट (TRF)चा दहशतवादी जहूर अहमद राठेर याला अटक केली आहे. राठेरवर भाजपचे 3 कार्यकर्ते आणि एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येचा आरोप आहे. राठेरने POK मध्ये दहशतवादाचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि राजौरी परिसरातून घुसखोरी करुन तो भारतात दाखल झाला होता. तो TRF मध्ये दहशतवाद्यांची भरती आणि शस्त्र पुरवठा करण्याचं काम पाहत होता. 2006 मध्ये त्यानं सरेंडर केलं होतं पण 2020 पासून त्यानं पुन्हा एकदा TRF साठी काम करायला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याला अटक करुन तपास सुरु केला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 2 वर्ष पूर्ण
2 वर्षापूर्वी 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये CRPFच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले होते. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CRPFच्या त्या 40 जवांना श्रद्धांजली अर्पण केली.

चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा दिवस कुणीही विसरु शकणार नाही, अशी भावना व्यक्त केली. आम्हाला आमच्या सुरक्षा रक्षकांवर गर्व आहे. त्यांची बहादुरी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. देशाच्या सशस्त्र दलांना वारंवार हे सिद्ध करुन दाखवलं आहे की, ते देशाच्या रक्षणासाठी पूर्णपणे सक्षम आहेत, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

error: Content is protected !!