ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेची थेट तळोजा करागृहापासून ते पुण्यापर्यंत काढली मिरवणूक.

मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेची थेट तळोजा करागृहापासून ते पुण्यापर्यंत काढली मिरवणूक.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️ज्ञानेश्वर पाटील | पुणे.
काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहाबाहेर फटाके फोडून एका गुंडाचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार घडला होता. आता त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेची (gajanan marne) थेट तळोजा कारागृहापासून त्याची पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

धक्कादायक बाब म्हणजे, अगदी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही जवळपास 300 चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती. चार वर्षांपूर्वी पंधरा दिवसात अमोल बधे, पप्पू गावडे आणि एकाचा खून करून मारणे टोळीने दहशतीचा नवा अध्याय शहरात सुरू केला होता.  सलग झालेल्या खूनानंतर शहरात टोळी युद्धाचा भडका उडेल अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी मारणे टोळीवर मोक्का कायद्याने कारवाई करत जवळपास तीन वर्ष गजानन मारणे याला कारागृहात जेरबंद करून ठेवलं होतं. मात्र, दहशतीच्या जोरावर सीसीटीव्ही सारखे पुरावे असताना ही पुणे शहराच्या मधावर्ती भागात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात एकही साक्षीदार खटल्याच्या सुनावणी दरम्यान पोलीस टिकवू शकले नाहीत आणि या सगळ्या गुन्ह्यातून गजानन मारणेची निर्दोष मुक्तता झाली.

error: Content is protected !!