ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

शेतक-याच्या मालाला मातीमोल भाव, त्यातच महावितरणची मोगलाई, टोमॅटोचा लालचिखल:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

___
. मोठ्या मेहनतीने शेतात पिकवलेल्या टोमॅटोला भाव नसल्याने शेतातील लालचिखल रानाच्या बाहेर काढण्यासाठी शेतक-याला परवडेनासे झाले असून त्यातच महावितरणकडून वीजतोडणी केल्याने मोगलाई आल्याची भावना शेतकरी पांडुरंग वाणी यांनी बोलून दाखवली.

सविस्तर माहीतीसाठी:-
______________________________________
मौजे लिंबागणेश ता.जि.बीड येथील शेतकरी पांडुरंग बाबासाहेब वाणी यांनी 20 गुंठे क्षेत्रात टोमॅटीची लागवड केली, बांबु, तारा बांधणी, मजूर, औषध फवारणी आदि. एकुण दीडलाख रूपये खर्च आला अपेक्षित उत्पन्न 4 लाख रूपये होते परंतु भरपूर पिक आल्यानंतर अचानक भाव पडल्याने बाजारात नेऊन विक्रीस न परवडल्याने शेतातच टोमॅटोचा लाख चिखल पाहण्याची वेळ आली असून वावराबाहेर काढणीसाठी अतिरिक्त खर्च परवडेनासा झाला आहे.

महावितरणची मोगलाई वसुली आणि ई-पीक पाहणीचा फार्स:-,डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
_________________________________________€
आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांची 6 दिवसापासून विजतोडणी केल्यामुळे पिकाचे नुकसान झालेले आहे, प्रत्येकी 5000 रू कोटोशन प्रमाणे विज जोडणी न करण्याचा महावितरणचे अभियंता यांच्या मोगलाई आदेशाने जास्तच अडचणीत आला आहे. त्याचबरोबर ई-पीक पाहणी केवळ फोटोसेशन पुरतीच मर्यादित असून शेतक-यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा रसत्यालगत शेतात फोटो काढून हाॅटेल मध्ये बसुन अहवाल लिहला जात असल्याची बहुतांश शेतक-यांची तक्रार आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.8180927572

error: Content is protected !!