ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

वर्षभरातच रस्त्याचे तिनतेरा, भ्रष्ट आधिकारी-ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार:-डाॅ गणेश ढवळे लिंबागणेशकर

___
ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनानंतर तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी 25-15 मधून दिलेल्या 23 लाख रूपये रसत्याचे तिनतेरा वाजले असुन निकृष्ट रस्त्याप्रकरणात आधिकारी-ठेकेदारांनी संगनमताने बोगसगिरी केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ग्रामविकास मंत्र्यासह माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनासुद्धा लेखी तक्रार केली आहे

सविस्तर माहीतीसाठी:-
______________________________ बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश ते काळेवाडी रस्ता, यादरम्यान मुळे वस्ती, जाधववस्ती, गिरे वस्ती, आदि एकुण 500 लोकसंख्या असलेल्या वस्तीला शालेय विद्यार्थ्यांना शाळेत चिखलातून जावे लागते, तसेच दुधदुभते, पालेभाज्या आणि मुख्यत्वेकरून रूग्णांना दवाखान्यात आणण्यासाठी पावसाळ्यात झोळी करून आणावे लागते आदि वस्तीवरील ग्रामस्थांच्या समस्यानंतर
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर व विद्यार्थ्यांना चिखलातून प्रवास करावा लागत असल्याच्या बातम्या दैनिकातुन प्रसिद्ध झाल्यानंतर तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता। मात्र आधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचे थातूरमातूर काम करून निधी घशात घातला

वर्षभरातच मोठमोठाल्या भेगा पडल्यामुळे वस्तीकरांची ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार:-डाॅ गणेश ढवळे लिंबागणेकर
______________________________वर्षभरापुर्वी केलेले रसत्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून रस्ता केवळ मोठाली खडी अंथरून त्यावर रोलरने योग्य पद्धतीने दबाई करण्यात आली नाही, सिमेंट रस्त्यावर मुबलक पाणी मारण्यात आले नाही त्यामुळे दोनच महिन्यात रस्त्याला भेगा पडु लागल्या होत्या, पावसाळ्यात त्यात पाणी शिरून भेगा मोठ्या झाल्या,70 वर्षानंतर आंदोलनानंतर मिळालेल्या रस्त्याची अवस्था पाहून वस्तिकरांमध्ये संतापाची भावना असून संबधित आधिकारी-ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्तांना केली आहे

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो।नं 8180927572

error: Content is protected !!