ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

टायगर गु्रपची बीडमध्ये एन्ट्री सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव शेकडो कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश

टायगर गु्रपची बीडमध्ये एन्ट्री
सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव शेकडो कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश

बीड (प्रतिनिधी):- महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात उंच भरारी घेत सामान्यांच्या जीवनातील अडीअडचणीला सदैव मदत करणारे पैलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या टायगर ग्रुपची बीडमध्ये इन्ट्री होत असून बीड येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा दि. 20 फेब्रुवारी रोजी करमाळा येथे तानाजीभाऊ जाधव यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. अनेक बेरोजगार तरूणांना टायरगु्रपच्या माध्यमातून रोजगार मिळून देण्याचे कार्य तानाजीभाऊंनी मोठ्या तळमळीने केले असून या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून टायगर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचे अविनाश जाधव यांनी ठरवले आहे.

राजकीय, सामाजिक व अनेक क्षेत्रातील मातब्बरांना पै.तानाजीभाऊ जाधव यांच्या कार्याची दखल घेतली आहे. टायगर ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मित्र परिवाराचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. अडचणीत सापडलेल्यांना टायगर ग्रुप मदत करतो, अन्याय-अत्याचाराविरोधात उभा राहतो. टायगर ग्रुपच्या एका हाकेला हजारो तरूण तात्काळ जमा होतात. हीच ताकद टायगर ग्रुपने कमावली आहे. तानाजीभाऊ जाधव यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत बीडचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव यांनी टायगर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचे ठरवले आहे. यासाठी दि. 20 फेबु्रवारी रोजी ता.करमाळा,जि.सोलापूर येथे असंख्य मित्र परिवार व कार्यकर्त्यांसोबत प्रवेश घेणार असल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!