ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

साताऱ्यातील या गावात विहिरी पेट्रोलने भरल्या आहेत, काय आहे सत्य वाचा !

सातारा  : देशभरात इंधन दरवाडीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. आज शंभरी गाठलेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. मात्र साताऱ्यातील सासवड मध्ये काही चोरट्यांनी भारत पेट्रोलियमची पाइप लाइन फोडल्यामुळे बंद विहिरीला पाण्यासारखा पेट्रोलचा उमाळा लागला आहे.

पेट्रोल चोरी करून चोरटे तसेच निघून गेले होते. त्यामुळे गळती लागलेल्या पाईपलाईनमधून बाहेर पडत असलेले हजारो लीटर पेट्रोल जमिनीत मुरले. त्यामुळे आता हे पेट्रोल विहिरींमधून बाहेर येत आहे. मात्र आखाती देशासारखी साताऱ्यात सुद्धा पेट्रोलच्या विहिरी सापडल्या अशीच अनेकांना वाटले होते.

प्रकरण असे की, मुंबई-पुण्याहून सातारा आणि सोलापूरकडे पेट्रोल वाहून नेण्यासाठी असलेल्या पाईपलाईनचा भाग सासवडमधून जातो. ही २२३ किलोमीटरची पाईपलाईन आहे. चोरट्यांनी सासवड गावाजवळ या पाईपलाईनला भगदाड पाडले. यामुळे हजारो लिटर पेट्रोलचा जमिनीत मुरले होते.

परंतु, पेट्रोल जमिनीत मुरल्याने चक्क दोन विहिरी या पेट्रोलने भरल्या आहेत. यामध्ये आजु बाजुच्या शेतांतील उभ्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. पाईपलाईनची गळती काढण्याचे काम यशस्वी झाले आहे. या घटनेचा तपास संबधित विभाग आणि लोणंद पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!