ब्रेकिंग न्युज
जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

अहिल्यादेवी स्मारक निधीचा शासन आदेश काढा : विक्रम ढोणे

अहिल्यादेवी स्मारक निधीचा शासन आदेश काढा : विक्रम ढोणे

भुमीपूजनाची तारीख घोषित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकासाठी निधीची तरतूद केल्याचा शासनआदेश
(जीआर) तातडीने काढावा, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारकाच्या भुमीपूजनाची तारीख घोषित करावी, अशी मागणी धनगर विवेक
जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

यासंदर्भात ढोणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे
यांना मुंबईत निवेदने दिली आहेत. ढोणे यांनी म्हटले आहे की, अहिल्यादेवींचे स्मारक शासकीय निधीतूनच झाले पाहिजे, यासाठी सातत्याने
पाठपुरावा सुरू आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची सुरूवातीपासून याप्रकरणी सकारात्मक भुमिका राहिली आहे. शासकीय निधीची तरतूद करून ऑक्टोंबर 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते स्मारकाचे भुमीपूजन होईल, असे त्यांनी जाहीर केले होते, मात्र त्यापद्धतीने काही घडले नाही. म्हणून 25 जानेवारी 2021 रोजी अभियानाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी महिनाभरात स्मारकाची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यानंतर शासनाने स्मारकाला दीड कोटींचा निधी दिल्याच्या बातम्या आल्या आहेत, मात्र त्यासंबंधीचा शासनआदेश निघालेला नाही. त्यामुळे साशंकता आहे. यापार्श्वभुमीवर निधी दिला गेला असेल तर शासन आदेश का काढला गेला नाही, असा सवालही ढोणे यांनी विचारला आहे.

निधी प्रस्तावित असेल आणि अर्थसंकल्पात तरतूद करायची असेल तर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेवून हा
निर्णय करावा, स्मारकाबरोबरच अहिल्यादेवी अध्यासनासाठी भरीव तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी भुमीपूजनाची तारीख जाहीर करावी, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

पालकमंत्र्यांच्या कार्यालयाकडून संवाद

विक्रम ढोणे यांनी निवेदने दिल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कार्यालयाकडून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. स्मारकासंबंधीच्या
नेमक्या मागण्या, सूचना यासंबंधी चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!