ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांचा कारनामा, Sex CD प्रकरणात अडकले मंत्री महोदय

कर्नाटक: कर्नाटक मधील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या सरकारमधील मंत्र्यांचा कारनामा समोर आल्यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा सरकारसमोर नवे संकट उभे राहिले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील जलसंवर्धन मंत्री रमेश जारकीहोली आणि एका अज्ञात महिलेचा व्हिडीओ समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार पोलीस सध्या महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये किती सत्यता आहे हे तपासून पाहत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी या प्रकरणासंदर्भात आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत एक बैठकही घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणामध्ये रमेश यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याच्याकडे राजीनामा मागितला जावा यावर या बैठकीमध्ये एकमत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र याच मुद्द्यावरून विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस पक्षानं त्यांचा राजीनामा मागितला आहे. मात्र सरकार संपूर्ण प्रकरणाची सत्यता बघूनच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

मात्र त्याच्या अनेक मंत्री सहकाऱ्यांनी मौन बाळगलं आहे. ज्या रमेश यांच्यावर आरोप करण्यात येत आहे त्यांनाही यासंदर्भात कोणतही भाष्य केलेले नाही. रमेश यांनी आपला फोन बंद ठेवला आहे. ६० वर्षीय रमेश हे सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या येडियुरप्पा सरकारमधील महत्वाचे मंत्री आहेत. रमेश हे कर्नाटकमधील बेळगावमधील लोकप्रिय मंत्र्यांपैकी एक आहेत.

error: Content is protected !!