ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पदाचा दुरुपयोग, तृणमूल काँग्रेसच्या ‘या’ खासदाराचा आरोप

पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहे. मोदी यांनी आपल्या पदाचा दुरपयोगाचा आरोप केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे, असे ओब्रायन यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते डेरेक ओब्रायन यांनी यासंबंधी निवडणूक आयोगाला एक पत्रंही लिहिलं आहे. करोना लसीकरणानंतर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्यावर तृणमूल काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.

करोना संक्रमण काळात करोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांचं आणि इतर करोना योद्ध्यांचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: घेत असल्याचे डेरेक ओब्रायन यांनी म्हटलं आहे.

१६ जानेवारीपासून देशभरात राबवण्यात येणाऱ्या करोना लसीकरण मोहिमेदरम्यान लस घेतल्यानंतर नागरिकांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून एक प्रमाणपत्र जारी करण्यात येत आहे. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आला आहे याला तृणमूलच्या खासदाराने विरोध दर्शवला आहे.

error: Content is protected !!