ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

मास्क न वापरणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अजित पवारांनी लगावला टोला

मुंबई : छत्रपती शिवाजी पार्क येथे मराठी भाषा दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती यावेळी मास्क न वापरण्याबद्द्ल पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारले असता मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो” असा सल्ला दिला होता. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

काही नेते म्हणतात मी मास्क लावतच नाही, पण बाकीच्यांना करोना झाला तर काय करायचे’, असा टोला लगावला आहे. करोनाविषयक नियम पाळणे गरजेचे आहे. पण काही नेते म्हणतात की मी मास्क लावतच नाही. पण असे न करता मास्क लावून काळजी घ्या, असा सल्ला अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना दिला आहे.

तसेच हा सल्ला देताना तुम्ही मास्क लावत नसल्याने इतरांना करोना झाला तर काय, असा प्रश्नही त्यांनी राज यांना विचारला. त्याचवेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही त्यांनी टोला लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्क लावायला पाहिजे, असे सांगत, ते प्रवीण दरेकर यांचे जुने नेते आहेत, असेही हसतहसत अजित पवार म्हणाले .

error: Content is protected !!