ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सातारा: पुणे येथून खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका करण्यात आल्यानंतर तळोजा कारागृहाच्या दारातून जंगी मिरवणूक काढण्यात आलेला कुख्यात गुंड गजा मारणे चांगलाच चर्चेत आला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केली होती. मात्र आता या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपी गजा मारणेला पोलिसांनी सातारा येथून अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

जावळी तालुक्यातील मेढा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी मारणे याला अटक केली आहे.जेलमधून निर्दोष सुटलेला गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. तो महाबळेश्वर वाई परिसरात मागील काही दिवसांपासून फिरत होता. मारणे गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापाला रचून त्याला अटक केले होते.

खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे याची तळोजा कारागृहापासून थेट आलिशान गाडीतून त्याची पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीनंतर पोलिसांवर आणि सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. या प्रकरणी आपल्या अटक होणार यापूर्वीच मारणे याने पाल काढला होता. मात्र अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

error: Content is protected !!