ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

चौघांचा गाडीवर प्रवास, चौघेही नदीच्या पाण्यात पडले, सात वर्षाच्या पोरीने बापाला वाचवलं, आजी नातवाचा बुडून मृत्यू

कराड : संरक्षण कठडा नसलेल्या फरशी पुलावरुन दुचाकी नदीत पडल्याने झालेल्या दुर्घटनेत आजी व नातवाचा बुडून मृत्यू   झाल्याची दुर्दैवी कराड तालुक्यातील आंबवडे कोळे येथे घडली. वांग नदीवर  असणाऱ्या फरशी पुलावरून दुचाकीवरून प्रवास करणाऱे संरक्षक कठडा नसल्याने दुचाकी पुलावरून डोहात पडुन चौघे पाण्यात बुडाले मात्र दुचाकीवरील पोहता येत असलेल्या सात वर्षाच्या मुलीने पित्याचे प्राण वाचवले मार पाण्यात पडलेल्या दुचाकीवरील आजीचं नातवाचा बुडून मृत्यू झाला.

एकाच दुचाकीवरुन चौघे प्रवास करत होते. मालन भगवान यादव (वय 57), पियुष शरद यादव (वय 4, रा. येरवळे ता. कराड) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेची कराड पोलिसात नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

देवदर्शनावरुन घरी परतत होते पण नियतीच्या मनात वेगळं होतं…

कराड तालुक्यातील येरवळे येथील एकाच कुटुंबातील चौघेजण शरद यादव (आई) मालन यादव समवेत दोन मुले तनुजा अणि पियुष दुचाकीवरून अंबवडे येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन घेऊन ते घरी परतत होते. परतताना पुलावरून दुचाकी त्यांची दुचाकी घसरली. त्याठिकाणी जुन्या पुलाचे बांधकाम सुरु असून खडी व वाळू त्याठिकाणी पसरली आहे. त्यामुळे फसगतीने चौघेही दुचाकीसह साधारण 20 फुट खोल नदीच्या डोहात पडले अणि बुडाले.

मुलीने बापाला वाचवलं पण…

तिघांनाही पोहता येत नव्हते. प्रसंगावधान राखून पोहण्यात तरबेज असलेल्या तनुजाने बुडत असलेल्या आजीला अणि भावाला ओढत आणुन पाण्याबाहेर काढले. काठावर आणले. पुन्हा शर्थीचे प्रयत्न करून वडिलांना पाण्याबाहेर काढण्यासाठी ती पुन्हा पाण्यात गेली. बाहेर काढत असताना तोवर काठावरील आजी अणि भाऊ पुन्हा घसरून पाण्यात पडली.

घटनेची माहिती मिळताच येरवळेसह परिसरातील नागरिकांनी धाव तिकडे घेतली. पोलिसांना कळविण्यात आले. शोध मोहिम राबविली. त्यानंतर भावाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र नियतीने तोवर डाव साधला अन् आजी अणि नातवाचा जीव त्यात गेला.

तिने पुरेपूर प्रयत्न केला पण…

वडील शरद यादव यांना वाचविण्यात तनुजा यशस्वी ठरली. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तिने केलेले धाडस वाखाणण्याजोगे ठरले. तेही केवळ सात वर्षाच्या जिगरबाज मुलीने जिवाची पर्वा न करता पोहण्याचा कलेचा पुरेपूर वापर करत तिघाचाही जीव वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले खरे मात्र तिच्या धडपडीला पुर्णत: यश आले नाही. आजी अणि भावाचा दुर्दैवी मृत्यु झाला.

error: Content is protected !!