ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

हिंगोली-परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आ.वरपुडकर तर उपाध्यक्षपदी गोरेगावकर.

हिंगोली-परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आ.वरपुडकर तर उपाध्यक्षपदी गोरेगावकर.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️परमेश्वर सावंत | हिंगोली.
हिंगोली-परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी मंगळवार रोजी जिल्हा बँक सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत नवनिर्वाचित ज्येष्ठ संचालकांसह अन्यजण उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता अध्यक्ष – उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करावयास सुरवात झाली. त्यावेळी आमदार वरपुडकर व सौ. प्रेरणा वरपुडकर या दोघांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर उपाध्यक्षपदासाठी औंढा नागनाथ सहकारी संस्था गटातील नवनिर्वाचित सदस्य राजेश भैय्या पाटील गोरेगावकर यांनी अर्ज दाखल केला होता अऩ्य कोणाचेही अर्ज आले नाहीत. छानणी प्रक्रियेतून हे अर्ज वैध ठरल्यानंतर सौ. प्रेरणा वरपुडकर यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला होता त्यामुळे अध्यक्षपदी आमदार वरपुडकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यापाठोपाठ दुपारी एक वाजता उपाध्यक्षपदी राजेश साहेबराव पाटील पाटील गोरेगावकर यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केली.भैय्या पाटील गोरेगावकर यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल हिंगोली जिल्ह्याभरात त्यांचे स्वागत केले जात आहे.

error: Content is protected !!