ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत वाशिम जिल्ह्यात नवीन नियमावली लागू.

‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत वाशिम जिल्ह्यात नवीन नियमावली लागू.

🔸अशोक काळकुटे | संपादक

रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी; तर सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने ३० एप्रिल पर्यंत राहणार बंद.

▪️दिपक मापारी | रिसोड.
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ब्रेक दि चेन अंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी 5 एप्रिल रोजी नियमित केले आहेत.
या आदेशानुसार रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१×२×३×) अन्वये संचारबंदी लागू असेल. संचारबंदीचे उल्लंघन केल्यास प्रतिव्यक्ती १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे..
तसेच दर आठवड्याच्या सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहणार असून, या कालावधीत पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित फिरता येणार नाही. प्रत्येक शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कामाशिवाय अथवा परवानगीशिवाय बाहेर फिरता येणार नाही. वैद्यकीय व त्या संबंधिताच्या सेवा जसे दवाखाने, चिकीत्सा केंद्रे, क्लिनिक वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मसी, औषधी कंपन्या, मीटर वैद्यकीय व आरोग्य सेवा निर्बंधाशिवाय २४ तास सुरू राहतील.
केवळ अत्यावश्यक सेवा प्रतिष्ठाने सुरू.
इतर प्रतिष्ठाने राहणार बंद.

अत्यावश्यक सेवा मध्ये येणारी अन्नधान्याची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, दूध डेअरी बेकरी, मिठाईची प्रतिष्ठाने, रेल्वे, टॅक्सी, आटो व सार्वजनिक बसेस, स्थानिक प्रशासनाकडून चालणारी पूर्व मान्सून तयारी, जिल्हा प्रशासनाकडून परवानगी दिलेल्या सार्वजनिक सेवा, मालवाहतूक, शेती संबंधी च्या सेवा, ई-कॉमर्स, अधिकृत मीडिया, जिल्हा प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी दिलेल्या सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियम पदार्थ, आयटी, सर्विसेस शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा आठवडाभर सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु

अत्यावश्यक सेवा प्रतिष्ठाने वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद राहतील..
सर्व अत्यावश्यक आस्थापना प्रतिष्ठाने या ठिकाणी ग्राहकांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर राहील.. याची दक्षता घ्यावी..
एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना आस्थापनांमध्ये अथवा प्रतिष्ठानमध्ये परवानगी राहणार नाही.
अत्यावश्यक शेवाची प्रतिष्ठाने मालक व इतर नोकरांनी केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे लसीकरण करून घ्यावे.. अत्यावश्यक सेवेच्या प्रतीस्थानामध्ये थेट ग्राहकांशी संपर्क टाळण्यासाठी काचेची सीट, डिजिटल पेमेंट, व उपाययोजनेचा उपयोग कोरणा विषाणू संसर्गापासून संरक्षणासाठी करावा.. आवश्यक सेवेची प्रतिष्ठाने वगळता इतर प्रतिष्ठाने बंद राहतील. बंद करण्यात आलेल्या प्रतिष्ठानमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी केंद्र शासनाच्या निकषाच्या आधीन राहुन लसीकरण करून घ्यावे. सहकारी संस्था खाजगी बँका,पीएसयु वीज वितरण कंपनी, दूरध्वनी सेवा पुरवठा दार विमा तथा वैद्यकीय विमा फार्मासिटिकल कंपन्या, सर्व नोन बँकिंग वित्तीय, महामंडळे सर्व, सक्षम दुतीय संस्था, वकिलांची कार्यालय, लस जीवनाश्यक औषधी, फार्मासिटिकल प्रोडक्ट इत्यादी वाहतूक करणाऱ्या व लायसन असणारे वाहतूक ऑपरेटर इत्यादी खाजगी आस्थापना कार्यालय आठवडाभर सकाळी ७ ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील.. त्याच्या व्यतिरिक्त इतर सर्व खाजगी अस्थापना, कार्यालय बंद राहतील.. या सर्व खाजगी अस्थापना कार्यालय कार्यरत व्यक्तींना केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे तातडीने लसीकरण करून घ्यावे. पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत सर्व व्यक्तींनी दर पंधरा दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करून या चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगावा, सदरचे नियम १० एप्रिल पासून अमलात येतील. खाजगी आस्थापना, कार्यालयाच्या व्यक्तीजवळ लसीकरण अथवा आसीटीपीसीआर चाचणीचे रिपोर्ट नसल्यास अशा व्यक्तीविरुद्ध 1 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल..
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिलेल्या खाजगी आस्थापना, कार्यालय सुरू राहू शकतील.. सर्व शासकीय कार्यालय एकूण क्षमतेच्या ५० टक्के कर्मचाऱ्याच्या उपस्थित सुरू राहतील. कोवीड उपायोजना संबंधित कार्यरत सर्व कार्यालये १०० टक्के उपस्थित सुरु राहतील. वीज वितरण, पाणीपुरवठा, स्वच्छता, बँकिंग व इतर वितीय सेवेशी संबंधित कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी त्यांच्या शिवाय सर्व अभ्यासगतासाठी सभा ऑनलाईन घेण्यात येतील. शासकीय कार्यालयामध्ये अभ्यास करताना प्रवेश दिला जाणार नाही. अपवादात्मक स्थितीत अभ्यासगताना आटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह अहवाल घेऊन प्रवेश देता येईल. खाजगी व शासकीय अशा दोन्ही कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर केंद्र शासनाच्या निकषानुसार लसीकरण करून घ्यावे.

error: Content is protected !!