ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

खासदार उदयनराजे भोसले यांचे हटके स्टईलने आंदोलन !

सातारा : राज्यात पुन्हा एकदा शनिवार आणि रविवार असा दोन दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात तीन आठवड्याचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय आज होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत होण्याची सहायता वर्तवली जात आहे त्यामुळं सर्व सामान्य आणि हातावरच पोट असलेल्या कामगारांचे अतोनात हाल झालेले पाहावयास मिळत आहे, याच विरोधात आता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे आघाडी सरकारविरोधात हटके आंदोलन केले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. या प्रतिकात्मक आंदोलनानंतर उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या निर्णयाविरोधात सरकारला इशारा दिला आहे.

उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. लोकांची आर्थिक अवस्था सरकारने लक्षात घेतली पाहिजे. लॉकडाऊन झाल्यास लोकांची उपासमार होईल. सरकारमधील कोणते तज्ज्ञ लॉकडाऊनचा निर्णय घेतात, असा सवालही त्यांनी विचारला. या लोकांच्या पाहिले तर ते कुठल्याही दृष्टीकोनातून तज्ज्ञ वाटत नाहीत असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

error: Content is protected !!