ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

बेड उपलब्ध नसल्याने वृद्ध महिलेवर रिक्षातच उपचार करण्याची वेळ.

बेड उपलब्ध नसल्याने वृद्ध महिलेवर रिक्षातच उपचार करण्याची वेळ.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️कृष्णा आंधळे | प्रतिनिधी
सातारा – खटाव तालुक्यातील वडूज ग्रामीण रूग्णालयात कोविड सेंटर बंद असल्याने एका कोरोना बाधित वृद्ध महिलेला रूग्णालयाच्या बाहेरच रिक्षामध्ये ऑक्सिजन लावावा लागला. येथील ७५ वर्षीय एक वृद्ध महिला आज (सोमवार) सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास कोरोना तपासणीसाठी आली होती. तपासणीनंतर संबंधित वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेची ऑक्सिजन लेवलची तपासणी केली असता ती अत्यंत कमी असल्याचं समजलं. त्यातच ग्रामीण रूग्णालयातील कोव्हिड सेंटरही बंद होते. आजपासून ते कार्यान्वित करण्यात येणार होते. मात्र, त्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदी स्टाफ उपलब्ध न झाल्याने ते सेंटर सुरू होऊ शकले नाही. शिवाय ग्रामीण रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग सुरू असल्याने त्याठिकाणी रूग्ण होते. त्यामुळे संबंधित महिला रूग्णाला रूग्णालयाच्या बाहेरच एका रिक्षामध्ये ऑक्सिजन लावण्यात आला होता. तेव्हा महिला रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र, तीन ते चार तास रूग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी कोरेगाव येथील खासगी रूग्णवाहिकेशी संपर्क साधून त्या रूग्णवाहिकेने रूग्णाला साताऱ्याला नेले. या घटनेची चर्चा आज शहरात सुरू होती. शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

error: Content is protected !!