ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

कोयना धरण परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के; धरण सुरक्षित.

कोयना धरण परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के; धरण सुरक्षित.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️कृष्णा आंधळे | प्रतिनिधी.
सातारा, रत्नागिरी, सांगलीसह अन्य जिल्हे व तालुक्यात आज ( मंगळवार) दुपारी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.० व २.८ इतकी होती. या भूकंपाचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झालेला नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. पाटण तालुक्यात यातून प्रथमदर्शनी कोणतीही हानी झाली नाही, अशी माहिती तहसीलदार योगेश टोम्पे यांनी दिली. दरम्यान, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश लोक हे दुपारच्या वेळेत विश्रांती घेत असताना अचानकपणे झालेल्या या सलग दोन भूकंपाच्या धक्यांमुळे लोक घाबरून घराबाहेर पळत सुटले.

आज दुपारी ३.२१ वाजता पहिला ३.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यात चिखली गावच्या पूर्वेस सात किलोमीटर अंतरावर होता. त्याची खोली १६ किलोमीटर अंतरावर होती. त्यानंतर काही मिनिटांत दुपारी ३.३३ वाजता दुसरा २.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्याचा केंद्रबिंदू धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यात चिखली गावच्या पूर्वेस सात किलोमीटर अंतरावरच होता. त्याची खोली १५ किलोमीटर अंतरावर असल्याचे भूकंप मापन केंद्र कोयनानगर येथून देण्यात आली.

दोन्ही भूकंपांची खोली अधिक असल्याने रिश्टर स्केलवरील त्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले. हे भूकंपांचे धक्के पाटण, कराड, सातारा, चिपळूण तालुक्यांसह वारणा खोऱ्यातही जाणवले. या भूकंपांचा कोयना धरणावर कोणताही परिणाम झालेला नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या शिवाय पाटण तालुक्यात सर्वत्र या भूकंपांचे धक्के जाणवले असले तरी प्राथमिक माहितीनूसार कोठेही हानी झालेली नाही. संबधित तलाठी, मंडलाधिकारी आदींना स्थानिक पातळीवर जावून माहीती घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे तहसीलदार योगेश टोम्पे यांनी सांगितले.

error: Content is protected !!