ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्रा तर्फे मोफत हेल्पलाइन ची सुरुवात.

मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्रा तर्फे मोफत हेल्पलाइन ची सुरुवात.

🔸अशोक काळकुटे | संपादक

वाशिम जिल्ह्यामध्ये क्रिसील फाउंडेशन चा उपक्रम.

▪️दिपक मापारी | रिसोड.
– रिझर्व बँक स्टेट बँक व नाबार्ड च्या माध्यमातून क्रिसील फाउंडेशन च्या साहाय्याने मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र च्या माध्यमातून लॉकडाऊन च्या काळात मोफत ग्राम साहाय्य हेल्पलाईन ची सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हा मध्ये वाढता कोरोना आजाराचा संसर्ग बघता ब्रेक द चेन या या शासनाच्या उपक्रमास साहाय्य म्हणून मोफत हेल्पलाईन ची सुरूवात करून लोकांना कोविड 19 आजारा विषयी जनजागृती म्हणून मोफत माहिती देणे सुरू आहे.या सोबत च बँकेत गर्दी न करता डिजिटल माध्यमाचा वापर करून आपले आर्थिक व्यवहार करण्याविषयी माहिती देण्यात येत आहे,यामध्ये यूपीआय, भीम अप्स ,गुगल पे ,*99# ,एटीएम ,आदी बद्दल सविस्तरित्या माहिती देण्याचे कार्य सुरू आहे.यासह कोविड 19 आजारा चा संसर्ग टाळण्यासाठी मास्क चा वापर करणे, आवश्यकता असेल तेंव्हाच घराबाहेर पडणे, सुरक्षित अंतर ठेवणे,वेळोवेळी साबणाने किंव्हा सॅनिटायझर नी हात धुणे ,खोकताना किंव्हा शिंकताना रुमाल चा वापर करणे आणि वेळोवेळी शासनास सहकार्य करणे आदी विषयी जनजागृती चे कार्य जिल्हात करण्यात येत आहे.मोफत माहिती साठी 9767103047, 9518754735, 9763686316,9421084585 या मोफत हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधू शकता.
सदर उपक्रम जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर ,नाबार्ड चे सहाय्यक व्यवस्थापक विजय खंडरे ,क्रिसील फाउंडेशन चे वित्तीय समावेशन विभाग चे राज्य व्यवस्थापक शक्ती भिसे, मनिवाइज केंद्र चे वाशिम जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

error: Content is protected !!