ब्रेकिंग न्युज
घाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान 

१८ वर्षांवरील लसीकरण मोहिमेसाठी उद्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार.

१८ वर्षांवरील लसीकरण मोहिमेसाठी उद्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️कृष्णा आंधळे | प्रतिनिधी.
अठरा वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनावरील लस देण्याच्या मोहिमेला येत्या १ मे पासून सुरुवात होणार आहे. मात्र त्यासाठी २४ तारखेपासूनच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. को-विन अॅपवर लोकांना नोंदणी करता येईल.

नोंदणी करण्याची प्रक्रिया आधीप्रमाणेच असणार आहे. यापूर्वीच्या टप्यांमध्ये केंद्र सरकारने डॉक्टर्स, सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासोबतच सुरुवातीला ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केले होते. आता १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत असून येत्या काही दिवसात रुग्ण संख्येच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने सरकारने १८ वर्षावरील सर्व लोकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतलेली आहे.

error: Content is protected !!