ब्रेकिंग न्युज
लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळे

सांगलीत रेमडेसिवीरचा काळाबाजार, दोन जण अटकेत.

सांगलीत रेमडेसिवीरचा काळाबाजार, दोन जण अटकेत.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️कृष्णा आंधळे | प्रतिनिधी.
रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. एक जण मिरज सिव्हीलमधील ब्रदर तर दुसरा विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयातील लॅब असिस्टंट यांना अटक केली आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी ( दि .२५ ) रात्री उशिरा ही कारवाई केली. एक इंजेक्शन विकताना संशयितांना रंगेहाथ पकडण्यात आले.

मिरज सिव्हील अर्थात शासकीय कोविड रुग्णालयातील ब्रदर सुमित हुपरीकर आणि खासगी लॅब टेक्नीशीयन दाविद वाघमारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन्ही संशयितांनी यापूर्वी दोन इंजक्शन चोरून विकली आहेत. एक इंजेक्शन ३० हजार रुपये असे दोन इंजेक्शन ६० हजार रुपयाला विकल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने कारवाई करत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार उघडकीस आणला.

error: Content is protected !!