ब्रेकिंग न्युज
पंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

दुखणे अंगावर काढून स्वतःचा, कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका  आ. शिवेंद्रसिंहराजे; कोणतेही लक्षण जाणवल्यास टेस्ट करण्याचे केले आवाहन .

मुख्य संपादक गंगाधर नाना काळ कुटे बातमी प्रकाशक पवार अभिजीत

सातारा- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सातारा शहरासह जिल्ह्यात गंभीर परिस्थिती आहे. कोणीही घाबरून न जाता ताप, सर्दी, खोकला आदी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. दुखणे अंगावर काढल्यास जीवावर बेतण्याचा धोका असून कोणीही कोरोनाबाबत हलगर्जीपणा करून स्वतःचा, कुटुंबीयांचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे कळकळीचे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. प्रशासनाकडून उपाययोजना सुरु असल्या तरी या महामारीला अटकाव करण्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारीने वागले पाहिजे. कोरोना हा बरा होणारा आजार आहे. त्यामुळे घाबरून जाऊन अथवा मला काय होतंय असं समजून दुखणे अंगावर काढण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. अगदी जीवावर बेतल्यानंतर रुग्ण उपचारासाठी दाखल होतात आणि मग वेळ निघून गेलेली असते, अशी संख्या खूप पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना आजारासंबंधी ताप, खोकला, सर्दी आदी कोणतेही लक्षण दिसल्यास तातडीने कोरोनाची टेस्ट करून घेणे आणि त्यावर उपचार सुरु करणे आवश्यक आहे. मगच पुढील धोका टळणार आहे.

लक्षणे असतानाही अनेकजण घरीच बसून दुखणे अंगावर काढतात. यामुळे ते स्वतःच्या आणि घरातील वृद्ध आई- वडील, पत्नी, मुले आदी कुटुंबियांच्या जीवाशी खेळत असतात. ही बाब अतिशय गंभीर असून एखादे लक्षण जरी जाणवले तरी टेस्ट करून घ्यावी. घरी बसून आपल्याला काहीही होणार नाही या भ्रमात राहून स्वतःचा आणि इतरांचा जीव कोणीही धोक्यात घालू नये, असे भावनिक आवाहन करतानाच कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहावे आणि स्वतःच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

#satara

#chhatrapati

#छत्रपति

#maharashtra

#shetkari

#satarakar

#sataracity

#ajinkyatara

#rajdhanisatara

#maratha

#marathi

#राजधानी_सातारा

#satara #satarabjp

#bjpmaharashtra

#Bjp4Maharashtra

#Bjp4Satara #Satara

#Chatrapati #छत्रपती

#Shivendraraje4Satara

#ShivendraRajeFC

#SHivendraRajeforSatara

#coronavirus #stayhome #staysafe

error: Content is protected !!