ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

एस.पी. साहेब उपचारासाठी एक रुपया नाही ; मदतीसाठी आर्त हाक देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू.

एस.पी. साहेब उपचारासाठी एक रुपया नाही ; मदतीसाठी आर्त हाक देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️परमेश्वर सावंत | हिंगोली.
राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन व औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना उपचारांविनाच प्रमाण गमवावा लागत आहे. अशातच, या कोरोना संकटाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी आदी कोविड योद्धे समाजाच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. मात्र, हिंगोलीतील एका पोलीस कर्मचाऱ्याचा आवश्यक मदतीविना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसह पोलीस विभागच आपल्या कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यासाठी किती हालगर्जीपणा करत आहे हे समोर आलं आहे. हिंगोली येथील गोरेगाव पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या सचिन इंगोले यांना अस्थमाचा त्रास होता. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची आई आणि वडील यांनाही कोरोना झाला होता. त्यांना उपचार व्यवस्थित मिळत नसल्याने त्यांनी थेट पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना उद्देशून एका ऑडिओ क्लिप केली. ज्यात इंगोले यांनी आपली व्यथा मांडली होती. वारंवार मदतीसाठी कॉल करूनही उपचारासाठी काहीही हालचाली होत नसल्याने थेट छतावरून उडी मारून जीवन संपवतोय करतोय असे इंगोले यांनी सांगितलं होतं. यानंतर त्यांची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र, त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासगर यांनी, ‘इंगोलेंना आम्ही तात्काळ आयसीयूमध्ये दाखल केलं होतं परंतु अस्थमाचा त्रास असल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांच्या उपचाराकडे आम्ही लक्ष देत आहोत, पण दुर्दैवाने आम्ही आमच्या कर्मचाऱ्याला वाचवू शकलो नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मा. एसपी साहेब तात्काळ मदत मागता मागता मला जीव देण्याची वेळ आलेली आहे. तरी पण मला तात्काळ मदत मिळत नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये असून माझे वडील माझ्यासोबत बिमार आहेत, माझी आई तिकडं बिमार आहे आणि एक रुपयाही जवळ नाही. मदत तर राहिलीच, कोणी येऊन बघायला पण तयार नाही.अस्थमाच ट्रिटमेंट मिळणं आवश्यक असताना दुसरीच ट्रिटमेंट दिली जात आहे. आपल्याला इतके कॉल करूनसुद्धा फक्त यायलेत कोणी तरी येतो म्हणायलय आणि कोणीच येईन.त्याच्यापेक्षा मी माझा जीव टेरेसवून उडी टाकून देत आहे’.

error: Content is protected !!