ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

विजेच्या धक्क्याने बैलांचा मृत्यू झालेल्या शेतकऱ्याची मोराळे,करपे,प्रभाळेंनी घेतली सांत्वनपर भेट.

विजेच्या धक्क्याने बैलांचा मृत्यू झालेल्या शेतकऱ्याची मोराळे,करपे,प्रभाळेंनी घेतली सांत्वनपर भेट.

🔸अशोक काळकुटे | संपादक

बीड जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालं आहे.
यादरम्यान केज तालुक्‍यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर बीड तालुक्यातील नेकनूर, सानपवाडी याठिकाणी विजा पडल्या यादरम्यान नेकनूर मध्ये विवाहित तरुण महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सानपवाडी याठिकाणी शेतकऱ्याच्या दोन बैलांचाही मृत्यू झाला होता. दोन्ही बैलाची किंमत जवळपास एक लाख रुपये इतकी होती शेतकऱ्याचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. येणारा काळ पेरणीचा असल्याने त्याच्यावर मोठे संकट ओढवले आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ या शेतकऱ्याला मदत देणे गरजेचे आहे. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी बीड जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्या सुशिलाताई मोराळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष_ कुलदीप करपे, शेतकरी कामगार पक्षाचे भाई दत्ता प्रभाळे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी बाबासाहेब गित्ते यांना मोठा धीर दिला व मदत करण्यासाठी सर्वत्तोपरी आम्ही प्रयत्न करू तसेच या संदर्भात बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना देखील बोलणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेत पशुधनाचा समावेश करावा-सुशिलाताई मोराळे.

भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलताना बीड जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे अपघात विमा या योजनेत शेतकऱ्यांच्या पशुधनाचा देखील समावेश करावा अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना स्वतःचं जनावर मुलापेक्षा प्रिय असतं ते गेल्यानंतर त्याचं केवढं मोठं दुःख होतं हे त्यालाच माहितं ते आपल्याला काय कळणार?.. यामुळे मृत्यू झालेल्या पशुधनाची पोकळी भरून निघू तर शकत नाही परंतु काही प्रमाणात मदत मिळण्यास मदत व्हावी यासाठी सरकारने आणि प्रशासनाने लक्ष घालून लोकनेते गोपीनाथराव मुंडे अपघात विमा या योजनेत शेतकऱ्यांच्या पशुधनाचा लवकरात लवकर सहभाग करावा अशा पद्धतीची मागणी सुशीलाताई मोराळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!