ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

अंबाजोगाईच्या स्वारातीच्या अधिष्ठातां बरोबर अँड. अजित देशमुख यांची चर्चा

अंबाजोगाईच्या स्वारातीच्या अधिष्ठातां बरोबर अँड. अजित देशमुख यांची चर्चा

अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) अंबाजोगाई येथिल आशिया खंडातील सर्वात पहिला आणि सुसज्ज असा रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व दवाखाना अस्तित्वात आहे. या दवाखान्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याबरोबर ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी चर्चा केली.

स्वामी रामानंद तीर्थ दवाखान्यामध्ये पाचशेच्या जवळपास बेड आहेत. यातील तब्बल तीन तिनशे नव्वद बेड हे ऑक्सिजन बेड आहेत. आज जवळपास तिनशे पन्नास पेशंट याठिकाणी ऍडमिट होते. दवाखान्याची ख्याती दूरवर पोहोचली असल्याने जिल्हा बाहेरील उस्मानाबाद, लातूर, जालना अशा ठिकानावरून अनेक प्रकारच्या रुग्णांना देखील या ठिकाणी उपचारासाठी यावे लागते. त्यामुळे या दवाखान्यात सातत्याने गर्दी असते.

कोरोना काळामध्ये रुग्ण मोठया प्रमाणात असल्याने दवाखाना भरलेला असतो. त्यातच अंबाजोगाई मध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात निघत आहे. अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त रुग्ण दररोज येत असल्याने दवाखाने प्रशासन जीव ओतून काम करत असतानाही हतबल होते.

दूरवरून येणारे अनेक रुग्ण हे सिरीयस झाल्यानंतर त्या-त्या रुग्णालयातून सोडलेले असतात. त्यामुळे ऑक्सीजन लावून हे रुग्ण येत असल्याने ते अंबाजोगाई येथील या दवाखान्यात पोहोचेपर्यंत आणखीनच बिकट परिस्थितीला तोंड देत असतात. त्यामुळे त्यांचा आजार वाढत जातो आणि अशा अनेक रुग्णांवर या दवाखान्यात उपचार केले जातात.

दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून येथील अनेक यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच काही मशिनरी खरेदी करणे देखील प्रस्तावित असल्याने हा दवाखाना रुग्णांसाठी वरदान आहे आणि ठरणार आहे. कोरोणाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंता व्यक्त करून अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी जनतेने जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे. शासनाने घालून दिलेली त्रिसूत्री पालन करून, सामाजिक अंतर ठेवून वागावे. मास्क आणि सॅनिटायझर वापरावे. कोरोना संपवण्यासाठी जनतेने शासनाचे नियम पाळले पाहिजेत,असे अधिष्ठाता सुक्रे यांनी यावेळी म्हटले. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

कोरोणा रुग्णांना दवाखान्यात देत असलेल्या सेवेचा जिल्हावासीयांना अभिमान आहे. त्यामुळे आपण आपल्या टीम कडून अजून चांगले प्रयत्न करून चांगले काम करून घेण्यासाठी सातत्याने अग्रेसर असावे. रुग्णसेवा करण्याची हीच संधी असल्याने रुग्णांना सर्वच कर्मचाऱ्यांनी मदत करावी, असे अँड. अजित देशमुख यांनी यावेळी म्हटले.

error: Content is protected !!