ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

कोल्हापुरात मोफत श्रीखंडासाठी नागरिकांच्या लांबच-लांब रांगा !

संपूर्ण राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे त्यातच रुग्णसंख्या सुद्धा झपाटयाने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. तसेच लोकांना योग्य ती खबरदारी घेऊन कोरोनापासून संरक्षणासाठी घरी राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र आज कोल्हापूरमध्ये एक वेगळीच घटना घडलेली समोर आलेली आहे. दाभोळकर कॉर्नर परिसरातील वारणा दूध विक्री केंद्रावर मोफत श्रीखंड मिळत असल्याने अनेकांनी येथे रांगा लावल्या होत्या. एकीकडे कोरोनाचा आकडा वाढत असताना अशा प्रकारची घटना घडणे थोडे विलक्षण आहे.

कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मनपाने कोल्हापुरात महापालिक प्रशासनाने कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. तरीही या परिसरात मोफत श्रीखंड वाटप होत असल्याने वारणा दूध संघाच्या सभासदांनी केंद्राबाहेर गर्दी केली होती. यावेळी सभासदांसाठी श्रीखंड वाटप सुरू असलेने आम्ही येथे ते घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांना कोणतीही परवानगी न घेता हे वाटप सुरू असल्याचे समजले. यावेळी त्यांनी लोकांना गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. शिवाय केंद्रावरील श्रीखंडाचे वाटपही थांबवण्यात आले.

error: Content is protected !!