ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

खतांची भाववाढ मागे घ्या- सभापती अशोक डक

*खतांची भाववाढ मागे घ्या- सभापती अशोक डक*
माजलगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटामुळे सर्वजण हवालदिल झालेले असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत,असा आरोप मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी केला आहे.
      या दरवाढीचा फटका बळीराजाला बसणार असल्याने ही वाढ तात्काळ मागे न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे सभापती अशोक डक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे निवेदन पाठवून भाववाढ कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केलेली आहे कोरोनामुळे सर्व ठप्प असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला बळीराजाने बळ दिले,अन्नधान्य, भाजीपाल्यात कुठेही कमतरता पडू दिली नाही त्याच बळीराजाच्या जीवावर केंद्रातील राज्यकर्ते उठले आहेत केंद्राच्या कृषी कायद्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन उभारले त्यांना न्याय देण्याऐवजी आंदोलनाचा वचपा म्हणून खताची भाववाढ केली आहे एकीकडे आधीच कोरोना महामारी चे संकट असताना खतांचे भाव दाम दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होईल सरकारने कर्मचारी व अनेकांना कोविड योद्धा पुरस्कार जाहीर केले विमा कवच दिले मात्र शेतकऱ्यांना कुठलीही सुरक्षा दिली नाही बाजारभावाची कोणतीही हमी नाही त्यामुळे मिळेल त्या भावात शेतमाल विकण्याची शेतकऱ्यावर वेळ आली आहे आस्मानी संकट पाचवीला पुजले असताना आता सुलतानी संकट डोक्यावर लादले आहे अशी टीकाही अशोक डक यांनी केली 1100 रुपयांचे डीएपी खत 1900 रुपये झाले यावरून या दरवाढीचा अंदाज लावता येईल 65 रुपये रुपयांचे डिझेल 92 रुपये केल्याने मालवाहतुकीचे दर वाढले कर्ज काढून किंवा भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर चालवणे ही कठीण काळात कठीण झाले आहे अशा स्थितीत शेतकऱ्यांना तारणार की मारणार याचा विचार केंद्रातील  राज्यकर्त्यांनी करावा असे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक म्हणाले

error: Content is protected !!