ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

कोरोना महामारीच्या नावाने दरवाढ करत शेतकऱ्यांची पिळवणूक -रवि पाटील जाधव.

कोरोना महामारीच्या नावाने दरवाढ करत शेतकऱ्यांची पिळवणूक -रवि पाटील जाधव.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️दिपक मापारी | रिसोड.
शेतकरी कोरोना संकटाबरोबरच महागाईने होरपळत असल्याने अनेकांचे घरात दैनंदिन लागणाऱ्या खर्चाचे मासिक आर्थिक बजेट कोलमडत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे रोजगाराला बाधा येऊन आर्थिक उत्पन्नाला खीळ बसल्याने प्रपंचाचा गाडा चालवितांना नाकी नऊ येत आहेत.शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळात पुन्हा एकदा खत दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. खतांच्या दरात एवढी किंमत वाढवून केंद्र सरकार कंपन्या आणि व्यापार्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. अश्याप्रकारे केंद्र व राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना कोरोनाचा नावां खाली वेठीस धरत आहे.राज्य शासन आणि केंद्र सरकार त्या पद्धतीने कोरणा चा वापर शेतकऱ्यांच्या विरोधात करीत असल्याची टीका भूमिपुत्रचे जिल्हा उपाध्यक्ष रवि पाटील जाधव यांनी केली आहे. एकीकडे दुष्काळाची दाहकता तर दुसरीकडे शेतमालाला अपेक्षित भाव नाही, अशा चक्रव्युव्हात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याऐवजी पुन्हा एकदा खत कंपन्यांनी दरवाढीचा शॉक देत मेटाकुटीस आणले आहे.पावसाळ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. पाणीटंचाई, पीक कर्जासाठी बँकांमध्ये रांगा, मालाला न मिळणारा हमीभाव, अचानक पावसाने मारलेली दडी असो किंवा हवामानातील बदल, वाढती महागाई अशा संकटातच खताचे दर वाढल्यामुळे बळीराजाची चिंता अधिक वाढली आहे.पावसाळा जवळ आला ग्रामीण भागातील शेतकर्यानां अनेक अव्हाणांना तोंड दयावे लागते. शेतकरी बांधवांना वेळेवर बी-बियाणे व‌ खतांची कमतरता पडणार नाही याची काळजी घेण्यात यावी. अशी विनंती भूमिपुत्रचे जिल्हा उपाध्यक्ष रवि पाटील जाधव केली आहे.

error: Content is protected !!