ब्रेकिंग न्युज
सत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवारविखेंच्या धनशक्तीसमोर लंकेंची जनशक्ती भारी – आ.भास्कर जाधव

रुग्ण मृत्यूच्या “डेथ ऑडिट” माहितीचे पिंपरी चिंचवड प्रशासनाला गांभीर्य नाही

रुग्ण मृत्यूच्या “डेथ ऑडिट” माहितीचे पिंपरी चिंचवड प्रशासनाला गांभीर्य नाही 

दैनिक सूर्योदय पुणे
१९ मे २०२१
पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये उपचार घेणाऱ्या शहरतील व शहराबाहेरील एकूण चार  हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे , या मृत्यूचं वेळेत डेथ ऑडिट झालं असत, तर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आरोग्या बाबत अधिक सावधानता बाळगता आली असती. त्याच बरोबर नागरिकही अधिक सतर्क झाले असते. याहूनही महत्वाची बाब म्हणजे डेथ ऑडिट न करणारे खासगी रुग्णालय नेमकी कोणती उपचार पद्धती अवलंबितात यावरही नियंत्रण राहील असतं, मात्र तसं न झाल्याने कोरणाबाधितांच्या मृत्यूबाबत इथला संभ्रम कायम आहे.
पिंपरी – चिंचवड शहरामध्ये सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याने कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याच चित्र बघायला मिळत आहे. मात्र त्याचवेळी कोरोना ग्रस्तांच्या मृत्यूने इथे अक्षरशः थैमान घातलं असून, दुसऱ्या लाटेत इथला मृत्युदर दुपटीने वाढल्याच आकडेवारीतून स्पष्ट होत आणि प्रत्येक मृत्यूच डेथ ऑडिट केलं गेलं नसल्यानेच इथला मृत्यदर आटोक्यात येत नसल्याचा आरोप रयत विद्यार्थी परिषदेने केला आहे.

error: Content is protected !!