ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी बनलेत देवदूत

सातारा | सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आल्याने पाटण मतदारसंघातील कोरोना रुग्णांना ऑक्सीजन,व्हेंटीलेटर बेडची कमतरता पडू नये यासाठी स्वत: पुढाकार घेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी सामाजिक बांधिलकी म्हणून दौलतनगर ता.पाटण येथे वर्षभरा पासून स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सगळा खर्च करीत अद्यावत ७५ ऑक्सीजन व १० व्हेंटीलेटर बेडचे कोवीड केअर सेंटर चालवून मतदारसंघातील कोरोना रुग्णांसाठी देवदूताचे कार्य करीत कोणताही दिखावा न करता जनतेला कोरोना महामारीपासून वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत.मतदारसंघातील हजारों कोरेाना रुग्णांना जीवदान देण्याचे उल्लेखनीय कार्य गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी केले आहे.

स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दौलतनगर देसाईंनी सुरु केलेल्या कोवीड केअर सेंटरमध्ये अद्यावत ७५ ऑक्सीजन व १० व्हेंटीलेटर बेड बसविले असून रुग्णांना ने आण करणेकरीता स्वतंत्र्य ॲम्बूलन्स उपलब्ध आहे.सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना गिझर,१०० लिटर शुद्ध पाणी,नवीन टॉयलेट तसेच येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय पथकाकरीता स्वतंत्र्यपणे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ट्रस्टच्या वतीने रुग्णांना आवश्यक नाष्ता,काढा, उखडलेली अंडी तसेच दोनवेळचे चांगल्या दर्जाचे जेवण देण्यात येत आहे.कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता एक नोडल अधिकारी,ऑक्सीजन बेडवरील रुग्ण पाहण्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्राचे ०२ वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी तसेच व्हेंटीलेटर बेडवरील रुग्ण पाहण्याकरीता स्वतंत्रपणे खाजगी अनुभवी वैद्यकीय अधिकारी, खाजगी सराव करणारे १६ डॉक्टर,०८ नर्स,०३ फार्मासिस्ट,०४ वॉर्ड बॉय, डेटा ऑपरेटर ०१ अशाप्रकारे वैद्यकीय पथक याठिकाणी तैनात आहेत.कोरोना रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करुन आवश्यक त्या सर्व सोईसुविधा येथे शंभूराज देसाईंनी शासकीय मदतीची अपेक्षा न करता कामाचा कोणताही गाजावाजा न करता स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या आहेत.आजपर्यंत हजारो कोरोना रुग्ण या सेटंरमधून उपचार घेवून बरे झाले असून त्यांनी मंत्री देसाईंचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!