ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

अचानक पाऊस आला अन् स्मशानभूमीत उडाला गोंधळ ; टायर, रॉकेल टाकल्यानंतरही..

अचानक पाऊस आला अन् स्मशानभूमीत उडाला गोंधळ ; टायर, रॉकेल टाकल्यानंतरही..

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️भरत सरपरे | मंडणगड.
चक्रीवादळामुळे स्मशानभूमी चे छप्पर पडून 1 वर्ष पूर्ण. पेवें ग्रामपंचायत कडे त्यासाठी निधी नसल्याचं ग्रामस्थांना प्रतिउत्तर.

स्मशानभूमी अलीकडच्या काळात वैकुंठ धाम या नावाने ओळखली जाते. पूर्वी गावाच्या बाहेर, ओढा किंवा नदीजवळ उघड्यावर अंत्यविधी केले जात असत. धगधगती चिता पाहून अक्षरशः भीती वाटत असे. पूर्वी स्मशानभूमी हा शब्द देखील भयावह वाटत होता. आज वैकुंठ धाम शब्द वापरताना भीतीचा लवलेश देखील वाटत नाही. आजची वैकुंठधाम बंदिस्त आहेत. पालिका किंवा महापालिका व ग्रामपंचायत त्याची देखभाल करतात.
मृत्यू हा महान आहे. सर्वांसाठी समान आहे. राजा असो व रंक, त्याला निसर्गाचे दान आहे. मृत्यूने परिवर्तने घडतात. शत्रू सारे मित्र बनतात. कालचे शिव्याशाप देणारे आज डोळे भरून रडतात. तोंड फिरवणारे सारे रांगेत येऊन दर्शन घेतात. नरकाची इच्छा धरणारे स्वर्गासाठी साकडे घालतात. छातीला छाती भिडवणारे खांद्यांसाठी पुढे धावतात. जीव घेण्यास आसुसलेले पुढे होऊन फुले वाहतात.मृत्यू समोर माना वाकतात, मान देण्यास संगिनी वाकतात. मृत्यू हा अटळ असतो म्हणून तो सत्य असतो. जीवनात काही मिळो वा ना मिळो मृत्यू सर्वांना मिळतो. जीवनात मानवाला आनंद,दुःख व यातना सहन करावा लागतात. पण मृत्यू झालेल्या व्यक्तीला स्मशानात अडचणीचा सामना करावा लागला आहे.
कोकणातील मंडणगड तालुक्यातील पेवे गावाची स्मशानभूमीची 3 एप्रिल 2020 ला निसर्ग चक्रिवादळामध्ये स्मशानभूमीचे शेड नासधूस होऊन खाली पडले होते. चक्रीादळामुळे स्मशान भूमी चे नुकसान झाले. जून 2021 ला 1वर्ष पूर्ण झाली. छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पण पडीक झालेल्या स्मशान भूमी च ग्रामपंचायत ला याची पूर्ण पणे माहिती असून ग्रामपंचायत व सरपंच,ग्रामसेवक यांचं दुर्लक्ष केलं.
तर ते शेड रीपेरिंग करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्यांना यांना पावसांच्या आत जर शेड नाही झालं तर पुढे परीस्थिती बिकट होईल तर ते ग्रामपंचायत च्या कार्यालय मधुन ग्रामस्थांना उत्तर असे मिळाले की स्मशान भूमी चे शेड बांधण्यासाठी निधी नाही उपलब्ध नाही. पण महाराष्ट्र शासनाने त्यासाठी आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसार विविध १२८ मार्गाने गावात निधी जमा केला जाऊ शकतो आणि या माध्यमातून गावातील विकास कामे केली जातात. पण असे न करता ग्रामस्थांना टाळाटाळ करून उत्तरे दिले जाते.
तर एक हकीकत विचित्र प्रकार घडला. ग्रामपंचायत दुर्लक्ष मुळे स्मशान भूमीत मृत शरीर वर शरीराला शरणावर प्रेतला अग्नी दिल्या नंतर पावसाची मुसळधार पडण्याची सुरूवात त्यात छप्पर नसल्यामुळे शरणावर ठेवलेलं प्रेत आणि सुकलेली लाकड पूर्ण पणे ओले झाले त्यामुळे अग्निने घेतलेली पेठ कमी होऊ लागली.त्यानंतर ग्रामस्थांनी सात ते आठ मोठ गाडीचे टायर आणले. ते शरणावर व खाली टाकून पेठेवले त्यात अरुण 15 लिटर राॅकेल चा वापर करण्यात आले.ते ही पावसाच्या समोर कमी पडू लागले. त्यामुळे प्रेत पूर्ण पणे अग्नी मिळाली नाही. चार चौघांनी मंडळी मिळून शरणावर अधून मधून मीठ मारत होते. पण पाऊस काही थांबायची लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे मृत शरीर अर्धवट जाळत होते असे पाहतच काही ग्रामस्थांनी चारही बाजूंनी शरणावर छत्र्या पकडल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही नंतर जवळपास एक ते दोन तास ग्रामस्थ मंडळी आगीजवळ प्रेत जाळण्यासाठी झुंजत होते.
नंतर पुन्हा पावसाने जोर धरला आणि शरणाची संपूर्ण पणे अग्नी विझली अर्ध जळेली प्रेत पाहून पुन्हा तीला खाली उतरवून आणि बाजूला एक खड्डा खोदून मूर्त शरीर वर अंत्यसंस्कार करण्यात आले. मेल्यानंतर ही माणसाला .अशी यातना भोगावी लागत आहेत. असा लाजिरवाणा प्रकार पेवे गावात घडला. ग्रामपंचायत ने स्मशान भूमीच वेळेत काम केलं असतं तर अशी लाजिरवाणा घटना घडली नसती.

error: Content is protected !!