ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

सामाजिक न्याय आणि मराठा समाज

सामाजिक न्याय आणि मराठा समाज

कोकण संपादक / भरत सरपरे

लेखक  / किशोर कासारे

दिनांक 25 जून 2019 राजर्षी शाहू महाराज यांची 147 वी जयंती महाराष्ट्रात साजरी होते आहे. राजर्षी शाहू महाराज सामाजिक परिवर्तनाचे आग्रही होते. सामाजिक न्यायासाठी झटणारे होते .म्हणूनच त्यांचा जन्मदिन” सामाजिक न्याय दिन ” म्हणून साजरा
करण्यात येतो.
नुकतेच त्यांचे वंशज संभाजीराजे, हे सामाजिक न्यायाची भूमिका घेत, मराठा आरक्षणासंदर्भात बाजू मांडताना दिसत आहेत. यादृष्टीने त्यांनी आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांची घेतलेली भेट, भविष्यात फार मोठे परिवर्तनाचे संकेत देणारी आहे. कारण आपल्याला माहीतच आहे. सामाजिक न्यायासाठी राजर्षी शाहू महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले होते. विसाव्या शतकावर आपल्या विचारांची मोहर उमटविणारे हे दोन महान नेते होते .त्यांचे वंशज जेव्हा एकत्र येतात तेंव्हा हा तमाम महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी एक दिशादर्शक संकेत ठरू शकतो.
परिवर्तन हे सांगून होत नसते. त्यासाठी स्वतः बदलावे लागते. शाहू महाराज परिवर्तन केवळ सांगणारे नव्हते; तर ते स्वतः बदललेले होते. आणि कृतीत आणणारे होते. शिक्षण हे सुधारणांची गुरुकिल्ली आहे. हे त्यांनी जाणले होते. त्यासाठी इंग्रजीचा त्यांनी अभ्यास केला होता.त्यातून त्यांची आधुनिकतेशी ओळख झाली होती. पारंपारिक रूढी, परंपरा ,अंधश्रद्धा यांच्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात आला होता. ज्या गोष्टी प्रगतीच्या, विकासाच्या आड येणाऱ्या आहेत, त्या त्यानी नाकारल्या होत्या. जातीयता, ही मानवतेच्या आड येणारी बाब आहे. हे त्यांनी जाणले आणि सामाजिक समते शिवाय, मानवी विकासाला पर्याय नाही. हे पक्के त्यानी ठरविले होते .त्यादृष्टीनं त्यांनी समता आणि न्याय रुजवणेस सुरुवात केली. 26 जुलै 1902 रोजी शेकडा 50 टक्के मागासलेल्या व्यक्तींची प्रशासनात नेमणूक करण्याचा ते आदेश काढतात. 119 वर्षापूर्वी आपल्या छोट्याश्या संस्थानात हा हुकुम काढून, त्याची अंमलबजावणी करतात. एवढेच नव्हे तर मागासवर्गीय कोण हे ठरवून टाकतात. ब्राह्मण, शेणवी, प्रभू, पारशी खेरीज इतर सर्व वर्ण मागासलेले समजावेत हे ते जाहीर करतात .त्यांची ही भूमिका सामाजिक न्यायाचे द्योतक ठरते.
मराठा समाज जागा होतोय आणि आरक्षणाची मागणी करतोय, ही निश्चितच परिवर्तनवादी व न्याय्य भूमिका आहे .कारण मराठा समाजाचे आर्थिक मागासलेपण खोल खेड्यात आपणास आजही पाहावयास मिळेल. मोजके मराठा सोडले तर बराच मराठा समाज गरीब असल्याचे निदर्शनास येते .हे वास्तव आहे. हे वास्तव जरी खरे असले तरी महत्त्वाचे आहे, मराठा समाज परिवर्तनास तयार आहे का? आर्थिक मागासलेपण दूर करणे फारसे कठीण नसते. खरी गरज आहे मानसिक, वैचारिक बदलातून अधिक सखोल,व्यापक होण्याची. आणि हे करण्यास मराठा समाज तयार आहे का? हे फार महत्वाचे आहे. कारण शाहू महाराजांनी व त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आरक्षणाची भूमिका या समाजाच्या पचनी पडली नव्हती. हे वास्तव दुर्लक्षित करता येणार नाही.
म्हणून मराठा समाजाला राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण विषयक भूमिका समजावून घ्यावी लागेल. आरक्षणा मागे अन्याय, अत्याचार व गुलामीचा मजबूत धागा आहे. हे समजून घ्यावे लागेल. आरक्षण म्हणजे केवळ सवलती नसून, ते प्रतिनिधित्व आहे .तो संसाधनातील वाट आहे . सगळे समाज घटक एका पायरीवर येण्याचा ,तो एक मार्ग आहे हे जाणून घ्यावे लागेल. या समानतेच्या पातळीवर येण्यासाठी, या मार्गावर आरुढ होण्यासाठी, मराठा समाजाने सामाजिक न्यायाची भूमिका जाणुन, उमजून घेऊन स्वतःमध्ये परिवर्तन करणे काळाची गरज आहे. यासाठी त्यांना महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा स्वीकारावा लागेल.
संभाजी राजे यांची भूमिका, सद्यस्थितीत मराठा आरक्षणाचे असली; तरी त्यांची एकूण विचारधारा आहे; परिवर्तनवादी आणि बहुजन समाजाला न्याय देणारी. व बहुजन समाजांतर्गत समन्वय, सलोखा ठेवणारी आहे. मराठा समाजाने संभाजीराजांच्या मूळ विचारधारेचा स्त्रोत आणि त्यांचे सर्वांगीण पैलू याचा अभ्यास करून आणि विचारांती स्वीकार करणे काळाची गरज आहे. आज ना उद्या आरक्षण मिळेल ही; पण या निमित्ताने मराठा समाज हा; अन्य बहुजन समाजासोबत एकाच पातळीवर उभे करून समतेचे नवे आयाम प्रस्थापित
करण्याऱ्या संभाजी राजेंना इथला मराठा समाज स्वीकारेल तेव्हाच परिवर्तनाची नांदी उभा महाराष्ट्र अनुभवेल. काय या व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिकेचा आजचा मराठा समाज खुलेपणाने स्वीकार करू शकेल.

error: Content is protected !!