ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

मुंडे महाविद्यालयात राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी

मुंडे महाविद्यालयात राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी

कोकण संपादन / भरत सरपरे

मंडणगड – दि 26: लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व वादविवाद मंडळाच्या वतीने राजर्षि शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून कोविड-19 अंतर्गत नियमानुसार सामाजिक अंतर ठेवून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमीत्ताने आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष सावंत होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, सांस्कृतिक विभागाच्या डॉ. संगीता घाडगे, डॉ. अशोक साळुंखे ,प्रा. संजयकुमार इंगोले, डॉ. धनपाल कांबळे, डॉ. शामराव वाघमारे, प्रा. विष्णू जायभाये, प्रा. ज्ञानदेव गीते, ग्रंथपाल दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. संगीता घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना डॉ. सुभाष सावंत म्हणाले की, शाहू महाराजांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने सर्वप्रथम आरक्षण सुरु करून व सामाजिक विषमतेवर प्रहार करुन सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे महान कार्य केले. त्यांनी शिक्षणातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडीत काढून बहुजनांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. तसेच कला, क्रीडा, साहित्य, संगीत आदींना प्रोत्साहन देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. म्हणून आपण सर्वांनी शाहू महाराज यांचा आदर्श आपल्या डोळयासमोर ठेऊन वाटचाल करावी. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी तर आभार डॉ. अशोक साळुंखे यांनी मानले.
फोटो ओळी:- M-04 सामाजिक न्यादिनानिमित्त राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, सोबत इतर मान्यवर.

error: Content is protected !!