ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

कोकणात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ…

कोकणात कोरूना रुग्णांची झ•पाट्याने वाढ…

कोकण संपादक / भरत सरपरे

संगमेश्वर / मंकरद जाधव , माझे अनुभव  ( साडवली )

 

संगमेश्वर- साडवली गावातून कोरोना पॉझिटिव्ह प्रमाण वाढतंय…माझं गावं साडवली. आज तिथे 28 पॉझिटीव्ह पेशंट आहेत..काही दिवसापूर्वी गावातील माझे ही दोन बंधू कोरोना पॉझिटीव्ह आल्याने.. मला त्यातील अधिकची काही माहिती लक्षात आली ती मांडतो आहे..
मुळात ही कोरोनाची दुसरी लाट. पहिल्या लाटेत अनेक व्हिडीओ मेसेजेस तयार होऊन आपण सोशल मीडिया द्वारे आपण वाचत किव्हा बघत आहोत.. कदाचित त्यामुळेच आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न तयार होतात. आणि नक्की काय करायचं ते कळतं नाही..आणि जीवावर बेतणारा मोठा घोळ तयार होतो..चर्चा करणं सोप्प असतं मात्र ती वेळ स्वतःवर आली तर संभ्रम निर्माण होतो. नक्की काय करायचं ते अनेकांना (माझ्यासहीत) कळतच नाही. त्यात अनेक लोकं वेगवेगळ्या पद्धतीने सल्ला मसलत करतात. असेही खुप लोकं आहेत सांगणारे..कीं काही नाही रे .. काही नाही होतं. मग प्रॉब्लेम तिथे होतो. म्हणून थोडं सविस्तर लिहितोय….

समजा आपल्याला किव्हा कुटुंबातील सदस्यला ताप येऊ लागला. तर आपण आपल्या फॅमिली डॉक्टर कडे जातो. ते गेलंच पाहिजे. मात्र दोन ते तीन दिवसानंतर ताप आल्यास ताबडतोब आपण antigen किव्हा RT PCR टेस्ट केली पाहिजे.
Antigen test -ही टेस्ट नाकाद्वारे केली जाते. रिपोर्ट पुढील 10 मिनिटात आपल्याला मिळतो…मात्र यामध्ये लोकांचं म्हणणं आहे कीं ही टेस्ट लोकांची पॉझिटीव्हच येते.. मात्र मी दोन वेळा केली तर ती दोन्ही वेळेस निगेटिव्ह आली..

RT PCR test -ही टेस्ट नाकाद्वारे आणि घशातील लाळेद्वारे केली जाते. रिपोर्ट रत्नागिरी येथे जातात. आणि आपल्याला दोन दिवसात रिपोर्ट मिळतात..मोबाईल द्वारे सुद्धा रिपोर्ट आपल्याला मिळतात..

माझं व्यक्तिगत मत. Antigen टेस्ट करण्यापेक्षा rt-pcr टेस्ट केलेली केव्हाही चांगली..

टेस्ट मध्ये पॉझिटीव्ह आल्यास काय करावं.?? जवळच्या कोविड हॉस्पिटल मध्ये जाऊन ऍडमिट व्हावं. व लगेचच उपचार चालू करावेत. त्याबरोबर तातडीने Hrct करून घ्यावी. Hrct साठी रत्नागिरीला जावं लागेल. माझ्या माहिती प्रमाणे देवरुख मध्ये होतं नाही.Hrct रिपोर्ट दोन तासात मिळतो. आणि आपल्याला स्कोर कळतो कीं आपल्या (lungs) फुफुसाला काही त्रास आहे का..
जर त्रास 5 प्रमाणात असेल तर. डॉक्टर सल्याने आपण गोळया औषधं घेऊन घरी (Isolate/Home Quarantine ) होऊ शकतो. (डॉक्टर मार्गदर्शन घेऊन). स्कोर 10 असेल तर आपण जवळच्या कोविड सेंटर मध्ये जाऊन ऍडमिट होऊन उपचार घेऊन सात आठ दिवसात बरं होऊ शकतो. मात्र पोटभर जेवलं पाहिजे..
समजा स्कोर 15 किव्हा त्यावर आला तर मात्र चांगल्या कोविड हॉस्पिटल म्हणजेच ज्या ठिकाणी ventilator आहेत. त्याच ठिकाणी उपचार केले पाहिजेत..
स्कोर highest level- ही 25 असते..
Ex :म्हणजेच ज्या व्यक्तीचा स्कोर 20 आहे.. म्हणजेच त्याच्या फुफुसाला 80% (डॅमेज) त्रास आहे असं समजावं..
म्हणून ताप किव्हा कोणतेही symptom जाणवले कीं टेस्ट पॉझिटीव्ह आली कीं *Hrct* करणं गरजेचं आहे. जे लोकं यामध्ये वेळ काढतात ते critical होतात..
15 च्या पुढे स्कोर येणं म्हणजेच क्रिटिकल असणं होय..अश्या वेळी आपण चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलला (शक्यतो प्रायव्हेट ) ला ट्रीटमेंट करून घेणं जरुरी होतं.सरकारी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आणि संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र रोजच नवे पेशंट वाढत आहेत. सर्व स्टाफ जास्तीचे तास कामं करून देखील माणसं कमी पडत आहेत. केंद्र,राज्य सरकार सर्वतोपर्री मेहनत घेत आहे 🙏तरीही मी दोन्ही ट्रीटमेंट difference बघतो आहे.ज्यांची आर्थिक बाजू चांगली आहे त्यांनी प्रायव्हेट ट्रीटमेंट घ्यायला हवी..
मित्र-मैत्रिणींनो, भावांनो -बहिणींनो.. नम्र पणे विनंती आहे कीं लवकरात लवकर लस (कोव्हीशील्ड )घेऊन या.. ज्यांनी एक डोस घेतला आहे. त्यांना त्रास कमी होतं आहे. ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत त्यांचा Hrct स्कोर 0 शून्य येतं आहे. फुफुसाला होणारा त्रास जास्त होतं नाही..काही लोकं आज पण लस घेण्यास नकार देत आहेत. चुकीचा समज करून जीव गमवाला लागला आहे अनेकांना.. तेव्हा सावध होऊया 🙏

आपला
मकरंद एस. जाधव
सामाजिक कार्यकर्ता

*शेवटी एकच सांगेन.. घाबरू नका,अंगावर काढू नका. टेस्ट करा,लवकर ट्रीटमेंट चालू करा. लवकर बरे व्हा*

error: Content is protected !!