ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

घाट शीळ पारगांव येथील आरोपीस कठोर शासन करावे एकल महिला संघटनेचे तहसीदार यांना निवेदन.

 

घाटशीळ पारगांव येथील आरोपीस कठोर शासन करावे एकल महीला संघटनेचे तहसीलदारांना निवेदन .

केज ( प्रतिनिधी )

नुकत्याच आपल्या मुलाकडुनच झालेल्या अमानुष मारहाण झालेल्या आईचा मृत्यू झालेला असुन वडीलही कोमात गेलेले आहेत .या घटनेने बीड जिल्हा हादरुन गेलेला असुन ही घटना माणुसकीला काळे फासणारी आहे .अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडु नयेत यासाठी या प्रकरणातील विकृत प्रवृतीच्या आरोपी मुलावर कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच पाहीजे या मागणीसाठी एकल महीला संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात नायब तहसीलदार श्री सचिन देशपांडे यांना निवेदन देण्यात आले आहे .एकल महीला संघटनेच्या कार्यकर्त्यां सामाजिक कार्यकर्त्यां गौरीताई शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अशा घटना या माणुसकीला काळीमा फासणार्या असुन भविष्यात अशा घटना घडु नयेत म्हणुन लवकरात लवकर आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे .या निवेदनावर गौरीताई शिंदे,मिरा नाईकवाडे,लता सावंत,तारा घोडके,राणी क्षिरसागर,उर्मिला गालफाडे, वच्छला शिनगारे यांच्या सह्या आहेत .

error: Content is protected !!