ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

महाविद्यालयातील ग्रंथापल पदांच्या भरतीसाठी ग्रंथपाल महासंघाचा बेमुदत उपोशनाचा इशारा

सोलापूर सहसंचालक कार्यालयासमोर १२ ऑगष्ट पासून करणार उपोषण

गेल्या दहा वर्षापासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारणाने रेंगाळली आहे. त्यात ग्रंथापाल पदाचाही ही समावेश आहे. ११ ऑगष्ट पर्यंत जर शासनाने भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी शासन निर्णय काढला नाही तर १२ ऑगष्ट पासून नांदेड सह राज्यातील दहा उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ च्या वतीने सहसंचालकांना निवेदन देऊन देण्यात आले

अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथापालांची पदभरती सुरु करावी व ४ मे २०२० रोजी पदभरती वर निर्बंध लादण्या अगोदर ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार भरतीची परवानगी मिळाली आहे अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी. तसेच खासगी विनानुदानित संस्थेमधील ग्रंथापालांची नियुक्ती विद्यापीठ नियमांना अधीनराहून वेतनश्रेणी नुसार करण्यात यावी या मुख्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण आंदोलन केले जाणार आहे.
ग्रंथालय हे महाविद्यालयाचा आत्मा समजला जातो. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल महत्वाची भूमिका बजावत असतो. मात्र महाविद्यालयातील एवढे महत्वाचे पद गेल्या अनेक वर्षापासून चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी २७ जून रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आठ दिवसात पदभरतीचा शासन निर्णय काढण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र एक महिना झाला तरी अद्याप त्यावर कसलीच कारवाई झालेली नाही. परिणामी ग्रंथपाल संघटनेने राज्यातील दहा सहसंचाल कार्यालयासमोर १२ ऑगष्ट पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्याचा निर्धार केला आहे.
ग्रंथपाल महासंघ च्या वतीने १२ ऑगष्ट रोजी सोलापूर सहसंचालक कार्यालया समोर जोपर्यंत शासन निर्णय निघणार तोपर्यंत बेमुदत साखळी उपोषण संदर्भात सहसंचालक यांना मंगळवारी (ता.२७) निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रंथपाल महासंघ चे उपस्थित होते.

आत्महत्याची परवानगी द्या

शासनाला जोपर्यंत पात्रताधारक आत्महत्या करणार नाही तोपर्यंत जाग येणार नसेल तर मुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री व वित्त मंत्री यांनी आम्हाला आत्महत्याची रितसर परवानगी देण्याची मागणी राज्यातील पात्रता धारकांनी सदरील निवेदनात केली आहे.सोलापूर सह संचालक साहेब यांना निवेदन देण्यात आले सोबत मा.लाळे सर, मा.मस्के सर, सौ.भावना मॅडम,मा.भाले सर ,मा.शिवशरण सर, मा. सुनील भगवान जोगतनकर सर

error: Content is protected !!